पिंपल्स आणि काळ्या डागांना वैतागलात ? ‘या’ 4 सोप्या घरगुती उपायांनी मिळवा सुटका !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – पिंपल्स, पुरळ येणं, चेहऱ्यावरील डाग किंवा काळेपणा यावर तुम्ही सर्व उपाय करून कंटाळले असाल तर यावर आता आपण काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

1) बेकिंग सोडा – बेकिंग सोड्याचा खूप फायदा होता. यामुळं चेहऱ्यावरील तेल कमी होतं. चेहऱ्यावरील धूळ आणि डेड स्कीनही दूर होते. एक चमचा बेकिंग सोड्यात थोडं पाणी आणि लिंबाचा रस टाका. घट्ट पेस्ट तयार करून चेहऱ्याला लावा. बेकिंग सोडा चेहऱ्यावर जास्त वेळ ठेवू नका. कारण यामुळं त्वचा कोरडी पडू शकते. त्यामुळं पेस्ट सुकल्यानंतर लगेच कोमट पाण्यानं चेहरा धुवून टाका.

2) पपई – पपईमध्ये व्हिटॅमिन ए असतं. पपई अँटीऑक्सिडंट आहे. हा एंजाइमचा चांगला स्त्रोत आहे. पपईत काळे डाग दूर करण्यासाठीचे पोषक घटक असतात. यामुळं पिंपल्सचीही समस्या दूर होते. चेहरा मऊ मुलायम राहतो. पपईचे तुकडे करून किस करून घ्या. ज्या ठिकाणी डाग आहेत तिथं लावा. 10 ते 15 मिनिटांनी चेहरा धुवा.

3) चंदन पावडर – चंदन पावडर घेऊन त्यात दूध आणि दही टाकून मिश्रण तयार करा. हा पॅक चेहऱ्याला लावा. सुकल्यानंतर चेहरा धुवून टाका. यामुळं चेहऱ्यावरील काळे डाग जातात.

4) लिंबाचा रस – चेहऱ्यावरील डागांसाठी हाही एक उत्तम उपाय आहे. या व्हिटॅमिन सी भरपूर असतं. चेहऱ्यावर लावण्यासाठी कायम ताज्या लिंबाचा वापर करा. यामुळं कमी वेळात डाग जातात. लिंबाचा सर घ्या. कापसाचा बोळा त्यात भिजवा आणि चेहऱ्यावर डाग असलेल्या ठिकाणी झोपण्याआधी लावा