प्रत्येकजण बनू शकतो ‘करोडपती’, दररोज 30 रूपये ‘इतके’ दिवस करा जमा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रत्येकाला श्रीमंत व्हायचे आहे. प्रत्येकाचे एक ध्येय असते. पण प्रत्येकजण ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही. याचे कोणतेही मोठे कारण नसते. फक्त एक ध्येय निश्चित करावे लागते आणि त्यानंतर ते लक्ष्य साध्य करण्यासाठी सतत गुंतवणूक आवश्यक असते. छोट्या गुंतवणूकीनेही मोठे ध्येय मिळवू शकता.

जर तुम्ही एखाद्याला सांगितले की, तुम्ही दररोज ३० रुपये वाचवून १ कोटी रुपयांचा निधी जमा करू शकता. प्रथम त्याला विश्वास बसणार नाही, कारण १ कोटी काही छोटी रक्कम नाही. पण हे खरे आहे की, जर कोणी दररोज ३० रुपयांची बचत करुन योग्य ठिकाणी आणि बर्‍याच काळासाठी गुंतवणूक करत असेल तर १ कोटी रुपयांचा निधी जमा केला जाऊ शकतो.

प्रेत्यकासाठी ध्येय आणि सतत गुंतवणूक आवश्यक
विशेषत: आजच्या युगात म्युच्युअल फंडात गुंतवणूकदारांचा कल वाढला आहे. कारण म्युच्युअल फंडमध्ये सतत गुंतवणूक केल्याने कोट्यवधींचा निधी तयार होऊ शकतो. गेल्या दोन दशकात म्युच्युअल फंडांनी उत्कृष्ट परतावा दिला आहे. काही लोकांनी दोन दशकांपूर्वी म्युच्युअल फंडात गुंतवणूकीचा मार्ग निवडला आणि करोडपती झाले. त्यामुळे जितक्या लहान वयात गुंतवणूक करण्यास सुरु कराल, तितके चांगले परिणाम मिळतील.

मोठ्या कालावधीसाठी म्युच्युअल फंड चांगला उपाय
जर एखाद्या तरुणाने पहिल्या नोकरीसह म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यास सुरवात केली, तर त्याला सर्वात चांगला निकाल मिळतो. कोणताही २० वर्षांचा तरुण त्याच्या खर्चातून दिवसाला ३० रुपये वाचवून करोडपती होऊ शकतो. हे कसे शक्य आहे ते जाणून घेऊया. यासाठी सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) च्या माध्यमातून दरमहा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करावी लागेल.

जर एखाद्या २० वर्षांच्या तरुणाने दररोज ३० रुपयांची बचत केली, तर महिन्याला ९०० रुपये होतात. आता ही रक्कम एसआयपीच्या माध्यमातून कोणत्याही वैविध्यपूर्ण म्युच्युअल फंडमध्ये गुंतवली जाऊ शकते. गुंतवणूक ४० वर्षे सुरू ठेवावी लागेल. म्हणजेच ४० वर्षांसाठी दरमहा ९०० रुपये गुंतवावे लागतील. या गुंतवणूकीत सरासरी १२.५ टक्के वार्षिक परतावा मिळून ४० वर्षानंतर एकूण १,०१,५५,१६० रुपये मिळतील.

दररोज ३० रुपये वाचवून व्हा करोडपती
जर तरुणाने ४० वर्षांत ४,३२,००० रुपये म्युच्युअल फंडच्या एसआयपीमध्ये गुंतवले आणि परताव्याला एक कोटी रुपयांहून अधिक परतावा मिळाला. हा अंदाज साडे १२ टक्के परताव्यानुसार लावला आहे. तसे बर्‍याच म्युच्युअल फंडांना २० टक्के परतावा मिळाला आहे. मग कल्पना करा की, किती मोठी रक्कम मिळाली असेल? दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकीत चक्रवाढ व्याज गुंतवणूक खूप मोठी करते.

म्युच्युअल फंडमध्ये धोक्यासह उत्तम परतावा
वय कितीही असो, आर्थिक तज्ञ आजच्या काळात म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. मात्र त्यात धोका देखील आहे. परंतु थोड्या धोक्यासह दीर्घ काळासाठी एसआयपीमार्फत गुंतवणूक केली, तर ते इतर गुंतवणूक पद्धतींपेक्षा एक चांगला पर्याय असल्याचे सिद्ध होईल. दीर्घकाळात महागाईशी केवळ म्युच्युअल फंडचे परतावेच लढू शकतात.

इतकेच नाही तर ३० वर्षांचा तरुण दिवसाला १०० रुपये बचत करून महिन्याला ३००० रुपये म्युच्युअल फंडमध्ये भरतो, तर अंदाजित परताव्याच्या आधारे ३० वर्षानंतर म्हणजे वयाच्या ६० व्या वर्षी करोडपती होईल.

२० वर्षात करोडपती होण्याचा मार्ग!
जर एखाद्याला २० वर्षांसाठी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर तोही करोडपती होऊ शकतो. यासाठी दरमहा किमान ९ हजार रुपये गुंतवावे लागतील. २० वर्षांत साडे १२ टक्के दराने १ कोटी रुपयांचा निधी तयार होईल. मात्र काही इक्विटी फंडांनी मागील २० वर्षात वार्षिक २० टक्क्यांहून अधिक रिटर्न सीएजीआरला दिला आहे. अशा निधीमध्ये दरमहा ५ हजार रुपयांची गुंतवणूक केल्यास १ कोटी रुपये होतील.

धोक्यासह हेही पर्याय
वैविध्यपूर्ण म्युच्युअल फंडऐवजी तुम्ही छोट्या किंवा मिडकॅप फंडातही गुंतवणूक करु शकता. हे २५-३० वर्षांपेक्षाही कमी आहेत, पण त्यात जास्त धोका असेल तर त्याचा फायदाही जास्त होतो. मात्र गेल्या जवळपास दोन वर्षांत म्युच्युअल फंडाच्या परताव्याचा आलेख किंचित खाली आला आहे. पण आता दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करता येते.

गुंतवणुक करण्यापूर्वी अगोदर काय करायचे?
म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सर्वात योग्य फंड निवडावा लागतो. छोट्या गुंतवणूकदारांसाठी फंडाची निवड करणे सर्वात कठीण काम असते, कारण योग्य फंडाची निवड करण्यासाठी बरेच संशोधन आवश्यक असते. त्यामुळे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व बाबींचा विचार करा, शक्य असल्यास एखाद्या अर्थ तज्ञाचा सल्ला जरूर घ्या, कारण ते बाजाराच्या जोखमीच्या अधीन असते.