‘ब्लुटूथ’चा ‘या’ 7 कामांसाठी होतोय उपयोग, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   सध्या लहान मुलांपासून ते ज्येष्ठ व्यक्तीपर्यंत फोन वापरला जातो. अनेकांच्या हातात स्मार्ट फोन दिसतो. तसेच इतर गॅजेट्सही अगदी सहज हातळलली जातात. या गॅजेट्समध्ये एक गोष्ट समान आहे, ती म्हणजे ब्लुटूथ. ब्लुटूथचा वापर वायरलेस हेडफोन्स किंवा इतर प्लग्स कनेक्ट करण्यासाठी प्रामुख्याने केला जातो. याशिवाय ब्लुटूथचा अनेक कामासाठी देखील उपयोग केला जातो. जाणून घेऊयात ब्लुटूथचा कोणकोणत्या कामासाठी वापर केला जातो.

1. फाईल ट्रान्सफर

दोन मोबाईल मधील ब्लुटूथ एकमेकांना कनेक्ट करून आपण फाईल शेअर करु शकतो. अशाप्रकारे तुम्ही ब्लुटूथचा वापर लॅपटॉप किंवा ब्लुटूथ अनेबल्ड पीसीला कनेक्ट करुन फाईल शेअर करु शकता. याचा स्पीड कमी असला तरी तुमच्याकडे डेटाकेबल नसली तरी तुम्ही फाईल ट्रान्स्फर करण्यासाठी या तंत्राचा उपयोग करुन शकता.

2. ब्लुटूथ टेथरिंग

ब्लुटूथ टेथरिंग उपयुक्त असून या तंत्राचा वापर करुन तुम्ही तुमच्या मोबाइलचं इंटरनेट लॅपटॉपसाठी देखील वापरू शकता. म्हणजेच यापुढे वायफाय बंद पडल्यास ब्लुटूथचा वापर करुन तुम्ही मोबाइल इनटरेन लॅपटॉपवर वापरु शकता.

3. मल्टी प्लेयर गेम्स

काही गेम्समध्ये एकापेक्षा अधिक खेळाडू एकत्र येऊन खेळू शकतात. अशा वेळेस तुमचे स्मार्टफोन्स ब्लुटूथने कनेक्ट करुन एकत्र खेळू शकता.

4. इतर उपकरणांना जोडा

ब्लुटूथ प्रामुख्याने दुसरी उपकरणं एकमेकांना जोडण्यासाठी वापरलं जातं. यामध्ये तुम्ही अगदी माऊस, कीबोर्ड, प्रिंटर्स, गेमपॅड सारख्या उपकरणांना कनेक्ट करुन विविध कामं अगदी सहज पूर्ण करु शकता.

5.सुरक्षिततेच्या दृष्टीने उपयोगी

सध्या स्मार्टहोम्सचे दरवाजे ब्लुटूथच्या मदतीने उघडली किंवा बंद केली जातात. तसेच ब्लुटूथमध्ये आलार्म सिस्टिमची देखील सोय करण्यात आलेली असते, जेणेकरुन मोबाईलचा वापर करुन ब्लुटूथच्या मदतीने आपण आपले घर सुरक्षित ठेवू शकता

6. गाडीला कनेक्ट करायचंय ?

ब्लुटूथच्या मदतीने तुम्ही तुमचा स्मार्ट फोन चारचाकीला कनेक्ट करु शकता, हे आपल्याला माहिती आहे ? ब्लुटूथच्या मदतीने गाडीला कनेक्ट करुन कॉल घेणं, मेसेज मोठ्या आवाजात ऐकणं आणि नेव्हिगेशनची मदत घेऊ शकता.

7. वायरलेस रिमोट

सध्या अनेक टीव्ही आणि डिशच्या रिमोटमध्ये ब्लुटूथचावापर केला जातो. एवढंच नाही तर मोबाइल ब्लुटूथचा वापर करुन तुम्ही टीव्हीला देखील सेट करु शकता. त्यामुळे ब्लुटूथचं तंत्र जुनं असलं तरीही या अद्यावत प्रणालीचा वापर करुन तुम्ही तुमची दैनंदिन कामं सहजपणे करु शकता.