तुम्ही पण PM मोदी यांच्यापर्यंत पोहचवू शकता तुमची ‘मन की बात’ ?, जाणून घ्या फोन नंबर -ई-मेल आयडी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जनतेसोबत संपर्क ठेवण्यासाठी पंतप्रधान मोदी सोशल मीडियावर सदैव ऍक्टिव्ह असतात. त्यामुळे त्यांचे फॉलोअर्स असलेले अनेक लोक त्यांना वारंवार मेसेज करून आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न देखील करत असतात. काहींना पंतप्रधानांना भेटण्याची इच्छा असते तर काहींना त्याना एखादी माहिती द्यायचे असते. मात्र अशा वेळी त्यांच्याशी संपर्क होणे खूपच कठीण असते. त्यामुळे आम्ही तुम्हाला असे चार मार्ग सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही थेट पंतप्रधानांशी संपर्क करू शकता.

फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून करू शकता संपर्क
फेसबुक आणि ट्विटर सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधानांना संपर्क केला जाऊ शकतो. तुम्ही अधिकृत अकाऊंटवरून तुमचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहचवू शकता.

या आहेत पंतप्रधान मोदींच्या सोशल मीडियाच्या लिंक

www.facebook.com/narendramodi
twitter.com/narendramodi
https://www.youtube.com/user/narendramodi
https://www.instagram.com/narendramodi

इ – मेल वरून करू शकता पंतप्रधान मोदींना संपर्क
जर तुम्हाला पंतप्रधानांशी संपर्क करायचा असेल तर तुम्ही त्यांच्या कार्यालयाच्या आयडीवर [email protected] किंवा त्यांच्या इमेल आयडीवर [email protected] संदेश पाठवू शकता.

पत्र पाठवून करू शकता मोदींशी संपर्क
वरती दिलेल्या माध्यमानुसार जर तुम्ही संपर्क करू शकला नाहीत तर तुम्ही खाली दिलेल्या पत्त्यावर पत्रव्यवहार करू शकता.
पत्ता – वेब इनफॉर्मेशन मॅनेजर, साउथ ब्लॉक, रायसीना हिल्स, नवी दिल्ली, पिन 110011

या फोन नंबरच्या साहाय्याने करा संपर्क
तुम्ही फोन किंवा फॅक्सच्या माध्यमातून देखील पंतप्रधानांना संपर्क करू शकता.
फोन नंबर – 011-23015603, 11-23018939, 011-23018668
फॅक्स नंबर – +91-11-23019545 या 23016857

 

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/