TIPS : PDF फाइल अशी करा कन्व्हर्ट Word मध्ये, जाणून घ्या पद्धत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपल्यापैकी अनेक लोक आपल्या कामानिमित्त रोज पीडीएफ फाइल्स वापरतात. त्या कंप्रेस्ड असल्या कारणाने खुप लाइट असतात आणि त्या कुठेही मूव्ह करणे सोपे असते, कारण फाइलचा फॉर्मेट कधीही बदलत. मात्र, एक गोष्ट ही सुद्धा आहे की, ती एडिट किंव बदलता येत नाही.

जर तुम्हाला पीडीएफ फाइलमध्ये काही दल करायचे असतील तर ती वर्ड फाइलमध्ये कन्व्हर्ट करावी लागेल. यासाठी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कशाप्रकारे तुम्ही पीडीएफ फाइल वर्ड फाइलमध्ये कन्व्हर्ट करू शकता.

फॉलो करा या स्टेप्स :
http://www.hipdf.com वर जा.

– या वेब पेजवर जाऊन पीडीएफ टू वर्ड ऑपशनवर जाऊन क्लिक करा.

– यानंतर चूज फाइल बटनवर क्लिक करा.

– येथे एक डायलॉग बॉक्स समोर येईल. यानंतर तुम्हाला त्या पीडीएफ फाइलवर जावे लागेल, जी तुम्हाला कन्व्हर्ट करायची आहे, आता ती सिलेक्ट करा.

– एकदा फाइल अपलोड झाल्यानंतर तुम्हाला ’कन्व्हर्ट’ बटनवर टॅप करावे लागेल.

– ही वेबसाइट यानंतर तुमची फाइल पीडीएफमधून वर्ड डॉक्यूमेंटमध्ये कन्व्हर्ट करते.

– फाइल कन्व्हर्ट झाल्यानंतर तुम्हाला डाऊनलोडवर क्लिक करावे लागेल.

ऑफलाइन पद्धत :
– तुमच्या डिव्हाइसमध्ये Wondershare PDFelement सॉफ्टवेयर डाऊनलोड करा आणि ते इन्स्टॉल करा.

– इन्स्टॉल झाल्यानंतर सॉफ्टवेयर ओपन करा आणि त्या पीडीएफ फाइल सिलेक्ट करा, जी तुम्हाला वर्ड डॉक्युमेंट कन्व्हर्ट करायची आहे.

– यानंतर हे सॉफ्टवेयर पीडीएफ फाइल वर्ड डॉक्यूमेंटमध्ये कन्व्हर्ट करेल.