कारचं मायलेज वाढवणं आता अगदी सोपं, फक्त टायर्स अन् ‘या’ गोष्टीमध्ये करा आवश्यक बदल, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन : जितक्याही मोठ्या आणि पॉवरफुल गाड्या आहेत त्या सर्वांमध्ये मायलेजचा इश्यू असतो. पॉवरफूल इंजिनमुळे कारना अधिक इंधन आवश्यक असते. यामुळे कारचे मायलेज कमी होते. अशा परिस्थितीत, जाणूल घेऊया कारचे मायलेज कसे वाढवायचे आणि तेही मेकॅनिकच्या भानगडीत न पडता.

हेवी क्रॅश गार्डः काही लोक कारमध्ये मेटलचे हेवी गार्ड बसवतात जेणेकरून अपघाता दरम्यान कारच्या पुढील भागाला इजा होणार नाही, परंतु जास्त वजन असल्याने असे गार्ड कारच्या इंजिनवर दबाव आणतात आणि तुमची कार अधिक फ्यूल कंज्यूम करते आहे मायलेज कमी होते. आपण अशी चूक करणे टाळावे.

रूफ रेल्स : ज्यांना आपल्या कारमधून अ‍ॅडव्हेनचरवर जाण्याची आवड आहे, ते सामान ठेवण्यासाठी रूफवर रूफ रेल्स बसनतात. हे रूफ रेल्स केवळ आपल्या कारचे वजनच वाढवत नाहीत तर त्यातील एरोडायनामिक स्ट्रक्चर देखील बदलतात, ज्यामुळे कारचे मायलेज कमी होते.

हेवी टायर्स: आजकाल लोक त्यांच्या गाडीला अग्रेसिव लुक देण्यासाठी भारी टायर्स बसवतात पण या टायर्सने मायलेज कमी केले. कारण या टायर्सनी इंजिनवर दबाव पडतो.

ओव्हरलोडिंग: आपल्या कारने ओव्हरलोडिंग टाळले पाहिजे. ओव्हरलोडिंगमुळे इंजिनचे कायमचे नुकसान होऊ शकते. एवढेच नाही तर मायलेजही लक्षणीय प्रमाणात कमी होते. म्हणूनच, राइड निश्चित मर्यादेनुसार करावी.