तुम्ही ‘ऑनलाईन’ असाल किंवा ‘ऑफलाईन’ असे करा पॅन आणि आधार लिंक

३० सप्टेंबर २०१९ , लिंक करण्याची अंतिम तारीख

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे दोन्ही महत्वाचे कागदपत्र आहेत. सुप्रीम कोर्टाच्या नियमानुसार पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य आहे. पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च होती मात्र आता आयकर विभागाने यामध्ये वाढ करून ३० सप्टेंबर २०१९ केली आहे. आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी दोन पद्धतींचा वापर करता येतो. ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने पॅन आणि आधारकार्ड लिंक करता येते.

मोबाईलवरून असे करा OFFLINE पॅन आणि आधार कार्ड लिंक
–फक्त एक मेसेज पाठवून आधार कार्डला पॅन कार्डशी जोडले जाऊ शकते.
–एसएमएसमध्ये UIDPAN स्पेस १२ अंकाचा आधार नंबर स्पेस १० अंकाचा पॅन नंबर टाईप करून मसेज पाठवायचा आहे.
–त्यानंतर, आपल्या मोबाईलवर एक मेसेज येईल यामध्ये आपली विनंती प्राप्त झाल्याचे सांगण्यात येते.
–यानंतर काही दिवसांनी आपल्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावर आधार कार्ड पॅन कार्डशी जोडले असल्याचा मेसेज येईल.

असे करा ONLINE पॅन आणि आधार कार्ड लिंक
–इनकम टॅक्स विभागाच्या www.incometaxindiaefiling.gov.in वर लॉग इन करा.
–त्यानंतर फॉर्म डाऊनलोड करून त्यामध्ये तुमची सगळी माहिती भरा.
–त्यानंतर संपूर्ण माहिती भरलेला फॉर्म ऑनलाइनच जमा करून आधार कार्डला पॅन कार्डशी लिंक करा.