NPS अकाऊंट फ्रीज झालंय तर ‘या’ पद्धती करा चालू, निवृत्तीनंतर सुद्धा होणार नाही पैशांची अडचण
नवी दिल्ली : एनपीएस सरकारी आणि प्रायव्हेट सेक्टरच्या कर्मचार्यांसाठी सरकार आणि पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) ची एक गुंतवणूक स्कीम आहे. एनपीएसशी संबंधीत प्रत्येक फायदा घेण्यासाठी ते चालू राहाणे खुप जरूरी आहे म्हणजे अकाऊंट फ्रीज झाले नाही पाहिजे. एनपीएस अकाऊंटमध्ये एक आर्थिक वर्षांत मिनिमम अमाऊंट जमा करणे जरूरी असते. जर असे केले नाही तर अकाऊंट फ्रीज होते. तुम्हाला नॅशनल पेन्शन सिस्टम अकाऊंटमध्ये ऑनलाइन लॉग-इन करण्यास अडचण येत असेल तर याचा अर्थ ते फ्रीज झाले आहे.
यामध्ये नोकरी काळादरम्यान गुंतवणूक केल्यानंतर व्यक्तीला वयाच्या 60 व्या वर्षी एकरकमी रिटायर्मेंट फंड आणि नंतर एन्युटी बेनिफिट उपलब्ध होते. यासोबतच एनपीएसमध्ये जमा रक्कमेवर टॅक्स सूट मिळते.
एनपीएस अकाऊंट का फ्रीज होते?
एनपीएस अंतर्गत दोन प्रकारचे अकाऊंट उघडता येतात, टियर-1 आणि टियर-2. टियर-1 हे रिटायर्मेंट अकाऊंट असते, तर टियर-2 एक वॉलंटरी अकाऊंट आहे, ज्यामध्ये कुणीही पगारदार आपल्याकडून गुंतवणूक सुरू करू शकातो. टियर-1 अकाऊंट उघडल्यानंतर टियर-2 खाते उघडते. एनपीएस टियर-1 ला सक्रिय ठेवण्यासाठी वार्षिक कॉन्ट्रिब्यूशन अगोदरच 6,000 रुपयांवरून कमी करून 1,000 रुपये करण्यात आले आहे. जर न्यूनतम वार्षिक गुंतवणूक केली नाही तर खाते फ्रीज केले जाते.
एनपीएस ऑनलाइन असे करा चालू
एनपीएस अकाऊंटला ऑनलाइन पुन्हा सुरू करू शकता. यासाठी ई-एनपीएस पोर्टलद्वारे 500 रुपये भरणे अनिवार्य आहे. यासाठी प्रथम ईएनपीएस पोर्टलवर जा. येथे ’कॉन्ट्रिब्यूशन’ वर क्लिक करा. पर्मनन्ट रिटायर्मेंट अकाऊंट नंबर (पीआरएन) आणि जन्म तारीख नोंदवल्यावर तुम्हाला पुढील पेजमध्ये कॉन्ट्रिब्यूशन करण्याची परवानगी मिळेल. 500 रुपयांचे किमान कॉन्ट्रिब्यूशन झाल्यानंतर तुम्हाला सीआरएकडून ईमेल मिळेल. यानंतर एनपीएस अकाऊंटमध्ये गुंतवणूक सुरू करता येते.
पीओपी-एसपी (ऑफलाइन) द्वारे कसे सुरू कराल?
खाते ऑफलाइन पुन्हा सुरू करण्यासाठी पीओपीच्या कार्यालयात जा. पीओपीच्या अधिकृत ब्रँच कलेक्शन पॉईंट म्हणून काम करते. यास पॉईंट ऑफ प्रेझेन्स सर्व्हिस प्रोवायडर्स (पीओपी-एसपी) सुद्धा म्हणतात. पीओपी-एसपीद्वारे कॉन्ट्रिब्यूशन केल्यानंतर तुम्हाला एनसीआयएस (एनपीएस कॉन्ट्रिब्यूशन इंस्ट्रक्शन स्लिप) भरावी लागेल. यामध्ये पेमेंटची माहिती, पीआरएएन इत्यादी सहभागी असते.
एनपीएस अकाऊंट अनफ्रीज करण्यासाठी अॅप्लीकेशन, कॉन्ट्रीब्यूशन व पेनल्टी मिळाल्यानंतर डिटेल्सला सिस्टममध्ये रेकॉर्ड केले जाते. सेंट्रल रिकॉर्डकीपिंग एजन्सी (सीआरए) मध्ये योगदानाची सूचना अपलोड केल्यानंतर आणि व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर एनपीएस अकाऊंट पुन्हा अॅक्टिवेट केले जाते.