HSC Paper Leak Case | बारावीचा गणिताचा पेपर फुटल्याप्रकरणी गुन्हा; संबंधित शिक्षकांचे निलंबन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – HSC Paper Leak Case | बारावीचा गणिताचा पेपर फुटल्याप्रकरणी राज्य मंडळाच्या मौखिक आदेशानुसार आणि अमरावतीच्या विभागीय मंडळाच्या लेखी आदेशानुसार बुलढाणा जिल्ह्यातील (Buldhana District) सिंदखेड राजा (Sindkhed Raja) येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणी आत्तापर्यंत सात संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून संबंधित शिक्षकांच्या निलंबनाचे निर्देश देण्यात आल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत सांगितले. (HSC Paper Leak Case)

बारावीच्या गणिताचा पेपर फुटल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता, त्यासंबंधी श्री केसरकर यांनी विधानसभेत निवेदन केले. (HSC Paper Leak Case)

मंत्री केसरकर म्हणाले, “उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा गणित या विषयाचा पेपर दि.०३.०३.२०२३ रोजी सकाळी ११.०० ते २.१० या वेळेत आयोजित करण्यात आला होता. पेपर चालू असतानाच साधारणतः दुपारी १२.३० च्या दरम्यान एका वृत्तवाहिनीवर या पेपरची ६ आणि ७ नंबरची पाने व्हायरल झाल्याची बातमी प्रसारित करण्यात आली. ही पाने साधारणात: सकाळी १०.३० नंतर व्हायरल झाल्याचे वृत्तवाहिनीवर प्रसारित करण्यात आले. आरोपींपैकी ३ आरोपी शिक्षक आहेत. हे स्वयंअर्थसहाय्यीत शाळेतील शिक्षक आहेत. शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जि. बुलढाणा यांना संबंधित शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्याबाबत विभागीय मंडळ, अमरावती यांच्यामार्फत कळविण्यात आले असून त्या अनुषंगाने शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि.प. बुलडाणा यांनी संबंधित शिक्षकांना तात्काळ निलंबित करण्याबाबत संबंधित संस्था / शाळांना निर्देश दिले आहेत.”

डिसिल्वा हायस्कूल, कबुतर खाना, दादर पश्चिम, मुंबई या केंद्रावर एका विद्यार्थ्याकडे मोबाईल आढळून आला व या मोबाईलवर इयत्ता १२ वी गणिताच्या पेपरचा काही भाग आढळून आला.
यासंदर्भात केंद्रसंचालक यांनी दि.०४.०३.२०२३ रोजी शिवाजी पार्क,
पोलीस ठाणे, दादर, मुंबई येथे फीर्याद दाखल केली आहे.
या गुन्ह्याचा तपास मुंबई पोलीस गुन्हे शाखेकडे (Mumbai Police Crime Branch)
गेला असून या गुन्हयामध्ये तीन अल्पवयीन व्यक्ती आरोपी आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत असल्याचेही केसरकर यांनी सांगितले.

Web Title : HSC Paper Leak Case | Crime in case of 12th maths paper leak; Suspension of concerned teachers

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Budget 2023 | शिवराज्याभिषेकाचे हे 350 वे वर्ष, अर्थसंकल्पात देवेंद्र फडणवीसांकडून मोठी घोषणा

Ghe Bharari | महिलांना सक्षम बनवणारे ‘घे भरारी’चे व्यासपीठ ! आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित सत्कार सोहळ्यात महिला उद्योजकांची भावना