Maharashtra Budget 2023 | शिवराज्याभिषेकाचे हे 350 वे वर्ष, अर्थसंकल्पात देवेंद्र फडणवीसांकडून मोठी घोषणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Budget 2023 | राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Finance Minister Devendra Fadnavis) यांनी गुरुवारी राज्याचा 2023 आणि 2024 चा अर्थसंकल्प सादर केला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पात (Maharashtra Budget 2023) घोषणांचा पाऊस पडला आहे. अनेक लोकप्रिय घोषणा करण्यात आल्या आहेत. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना (Farmers) मोठा दिलासा देण्यात आला आहे. तर धनगर समाजाला (Dhangar Community) बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) राज्याभिषेकाचे 350 वं वर्ष असल्याने या महोत्सवासाठी 350 कोटींची तरतुद करण्यात आली आहे.

सन्मान आपल्या युगपुरुषाचा, ठेवू या आदर्श शिवरायांचा!

– छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे हे 350 वे वर्ष. या महोत्सवासाठी 350 कोटी रुपये
– आंबेगाव (पुणे) येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान: 50 कोटी
– मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथे शिवचरित्रावरील उद्याने : 250 कोटी रुपये
– शिवनेरी किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या जीवनचरित्रावर संग्रहालय. शिवकालिन किल्ल्यांचे संवर्धन : 300 कोटी रुपये

महाराष्ट्र मेंढी, शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना करणार

10 हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार
22 योजनांचे एकत्रिकरण, मंत्रिमंडळ शक्तीप्रदत्त समिती मार्फत अंमलबजावणी
महाराष्ट्र मेंढी व शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना करणार
10 हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार
अहमदनगर येथे मुख्यालय असणार
राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेत (Raje Yashwantrao Holkar in Mahamesh Yojana) मेंढीपालनासाठी भरीव निधी

Web Title : Maharashtra Budget 2023 | big announcement from Devendra Fadnavis in the budget

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ghe Bharari | महिलांना सक्षम बनवणारे ‘घे भरारी’चे व्यासपीठ ! आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित सत्कार सोहळ्यात महिला उद्योजकांची भावना

Maharashtra Budget 2023 | राज्याच्या अर्थसंकल्पावर विरोधकांच्या प्रतिक्रिया, कोण काय म्हणालं?

Kolhapur ACB Trap | स्थायित्व प्रमाणपत्र दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी, सी.पी.आर. हॉस्पिटलमधील वरिष्ठ लिपिक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Kolhapur ACB Trap | स्थायित्व प्रमाणपत्र दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी, सी.पी.आर. हॉस्पिटलमधील वरिष्ठ लिपिक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune District Consumer Protection Council | पुणे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्य निवडीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

CM Eknath Shinde On Maharashtra Budget 2023 | प्रगतीवर आलेले मळभ दूर करणारा, विकासाचे चक्र गतिमान करणारा अर्थसंकल्प ! गोरगरीब, शेतकरी, महिलांना न्याय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे