Huma Qureshi | अभिनेत्री हुमा कुरेशीने शेअर केले नवे फोटोशुट; नेटकऱ्यांनी केले कौतुक

पोलीसनाम ऑनलाइन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री हुमा कुरेशी (Huma Qureshi) हीने तिच्या अभिनय कौशल्याच्या बळावर मनोरंजन विश्वात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. अभिनेत्री हुमाने अनेक चित्रपटातील भूमिकांमधून प्रेक्षकांवर भूरळ पाडली आहे. हिमाचा मोठा चाहता वर्ग असून तिच्या आगामी चित्रपटाबाबत प्रेक्षकांना उत्सुकता लागलेली असते. तसेच तिची सोशल मीडियावर खूप फॅनफॉलोईग असून ती फोटो शेअर करत असते. अभिनेत्री हुमा कुरेशीने (Huma Qureshi) नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. यामधील तिच्या अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

अभिनेत्री हुमा कुरेशीने नानाविध प्रकारच्या भूमिका ताकदीने पडद्यावर मांडल्या आहेत. तिच्या दमदार अभिनयाचे अनेक चाहते आहेत. ती लवकरच तरला (Tarla) चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. (Huma Qureshi Upcoming Movie) यानिमित्ताने हुमाने तिच्या ऑफिशियल इन्यस्टाग्राम अकाऊंटवर फोटोशुटचे काही फोटो शेअर केले आहेत. (Huma Qureshi Hot Photo) या खाली कॅप्शनमध्ये तिने “मेनी मूड्स ऑफ तरला” लिहिले आहे. या फोटोमध्ये हुमा डस्टी ऑरेंज कलरच्या ब्लेझर घालून फॉर्मल लूकमध्ये दिसत आहे. यामध्ये तिने लाईट मेकअप केला असून केस मोकळे सोडून लूक पूर्ण केला आहे. तिचे हे फोटोशुट चाहत्यांना फार आवडले असून ते कमेंटसचा वर्षाव करत आहेत.

हुमा कुरेशी ((Actress Huma Qureshi)) लवकरच एक जीवनपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. चित्रपटाचे नाव ‘तरला’ असून हुमाचा हा चित्रपट एक प्रसिद्ध कुकच्या आयुष्यावर आहे. अभिनेत्री हुमा कुरेशीचा ‘तरला’ हा चित्रपट भारतातील सर्वात प्रतिष्ठित होम शेफ तरला दलालच्या (Home Chef Tarla Dalal) प्रवासावर आधारित आहे. तरला दलाल या स्वतःचे कुकबुक आणि फूड शो असलेली पहिल्या भारतीय महिला होत्या आणि त्यांच्या कामगिरीसाठी ‘पद्मश्री’ मिळविणाऱ्या त्या एकमेव भारतीय आहेत. (Padma Shri Award) याच महान तरला दलाल यांची मुख्य भूमिका अभिनेत्री हुमा कुरेशी साकारणार असून येत्या 7 जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘तरला’ या चित्रपटाचे दिग्दर्शन पियुष गुप्ता (Director Piyush Gupta) यांनी केले असून यामध्ये शरीब हाश्मी (Sharib Hashmi), भारती आचरेकर (Bharti Achrekar), अमरजीत सिंग (Amarjeet Singh), राजीव पांडे (Rajeev Pandey), पूर्णेंदू भट्टाचार्य (Purnendu Bhattacharya) आणि वीणा नायर (Veena Nair) हे कलाकार देखील झळकणार आहे.

Web Title : Huma Qureshi | huma qureshi latest photo shoot instagram viral Entertainment News

Join our WhatsApp Group, Telegram,facebook page andTwitter for every update

हे देखील वाचा