सोलापूर शहर-जिल्ह्यात ‘कोरोना’ची शंभरी, शहरात 5 जणांचा मृत्यू

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – सोलापूर शहर आणि जिल्ह्यात कोरोना विषुणाचा प्रादुर्भाव वाढत आहे. सोलापूर ग्रामीणमध्ये कोरोना व्हायरसने शिरकाव केल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. बुधवारी (दि.8) सोलापूर शहरात 90 रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झालं आहे. तर सोलापूर ग्रामीणमध्ये 20 जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा ससंर्ग वाढत असल्याचे दिसून येत आहे.

बुधवारी सोलापूर शहर आणि जिल्ह्यात एकूण 110 कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर शहरातील पाच जणांचा तर ग्रामीणमध्ये तिघांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भवानी पेठ, उमा नगरी, एकता नगर, सिद्धी अपार्टमेंट आणि अभिषेक नगर येथे प्रत्येकी चार तर शाहीर वस्तीत सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. शहरात कोरोना विषाणूने थैमान घातले असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून कडक उपाय योजना केल्या जात आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती

– आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधितांची संख्या – 607 (387 पुरुष, 220 महिला)

– आजपर्यंत एकूण मृतांची संख्या  – 30 (23 पुरुष, 7 महिला)

–  रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या  – 307 (202 पुरुष, 105 महिला)

– रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या – 270 (163 पुरुष, 107 महिला)