प्रियकराला खेटून अन् हातात हात घालून फिरत होती पत्नी, व्यापार्‍यानं पाहिलं अन् भररस्त्यात चोपलं

कानपूर : पोलीसनामा ऑनलाइन – प्रियकराच्या हातात हात घालून फिरणाऱ्या महिलेला पतीने रंगेहात पकडून रस्त्यामध्ये धिंगाणा घातल्याचा प्रकार उत्तरप्रदेशच्या कानपूर मध्ये समोर आला आहे. पतीने पत्नीच्या प्रियकराला भररस्त्यात चपलेने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर हा गोंधळ पाहून बघ्यांनी एकच गर्दी केली. त्यातील काही जणांनी हात धुवून घेतले. दरम्यान, घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी पत्नीसोबत तिच्या प्रियकराला आणि पतीलाही पोलीस ठाण्यात घेऊन गेले.

फीलखाना भागातील मॉलरोडवर रात्री हा हायव्होल्टेज ड्रामा पाहावयास मिळाला. हरबंश मोहालमध्ये राहणाऱ्या एका व्यापाऱ्याच्या पत्नीचे परिसरातील एका व्यापारी तरुणासोबत प्रेमसंबंध जुळल्याच स्थानिकांनी त्यास सांगितलं होते. म्हणून तो त्याच्या पत्नीवर लक्ष ठेवून होता. पती घरात नसताना ती प्रियकरास घरी बोलवायची, फिरायला जायचे. तेव्हाच पत्नी प्रियकरासोबत फिरायला गेल्याची माहिती त्याला मिळाली. त्याने आपल्या मित्रांच्या साहाय्याने पत्नी आणि प्रियकरास रंगेहाथ पकडलं. नंतर पतीने मित्रांच्या मदतीने प्रियकराला चपलेने आणि लाथाबुक्क्यांनी कपडे फाटेपर्यंत चोप दिला.

एवढे होऊन सुद्धा प्रियकराला वाचवण्याचा प्रयत्न व्यापाऱ्याची पत्नी करत होती. काही वेळात पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी पत्नी, तिचा प्रियकर आणि तिच्या पतीसोबत मित्रांनाही पोलीस स्टेशन मध्ये घेऊन गेले. पोलिसांनी सांगितल्यानुसार, महिलेचा पती आणि प्रियकर हे दोघे सुद्धा किराणा मालाचे व्यापारी आहेत. दोघांनी संगतमताने मिटवून घेतले असून त्यांनी एकमेकांच्याविरुद्ध कोणत्याही प्रकारची तक्रार नोंदवली नाही.