रुग्णालयातच पतीने केली पत्नीकडे सेक्सची मागणी, नकार देताच घडले असे काही

चित्तूर : पोलीसनामा ऑनलाईन – रुग्णालयात मुलावर उपचार सुरु असताना त्याची सेवा करणाऱ्या महिलेच्या पतीने रुग्णालयातच तिच्याकडे शरीरसंबंधांची मागणी केली. परंतु तिने नकार दिल्यावर तिला जबरदस्तीने छतावर नेऊन तिच्याशी सेक्स करून तिला गंभीर मारहाण केली. यात तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना चित्तूरच्या सरकारी रुग्णालयात तीन दिवसांपुर्वी घडली.

पद्मा (३२) च्या मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. ती त्याची सेवा करण्यासाठी रुग्णालयातच होती. दरम्यान तिचा पती नंदा तिच्याकडे रुग्णालयात आला. त्याने तिच्याकडे सेक्सची मागणी केली. तिने नकार दिला. तेव्हा तो तिला सतवू लागला आणि जबरदस्तीने तिला रुग्णालयाच्या छतावर घेऊन गेला.

त्यानंतर तिथे तिच्यासोबत सेक्स करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तिच्या गुप्तांगांवर गंभीर जखमा झाल्या होत्या त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला होता. पद्मा यामुळे कोमात गेली.त्यानंतर तिच्यावर उपचार सुरु असताना तीन दिवसांनंतर तिचा मृत्यू झाला.