अनैतिक संबंध ! शिक्रापूरमध्ये पतीने केले पत्नीच्या प्रियकराच्या डोक्यात हातोडीने वार

शिक्रापूर : पोलीसनामा ऑनलाइन – पत्नीचे तिच्या प्रियकरासोबत असलेले अनैतिक संबंध उघड झाल्यानंतर रागाच्या भरात पतीनं पत्नीच्या प्रियकराचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी शिक्रापूर येथे ही घटना घडली. आयुब सिकंदर शेख (राहणार वाकत, ता. रिसोड, जि. वाशिम) असं या आरोपी पतीचं नाव आहे. तर मोईन दिलावर खान(राहणार वाकत, ता. रिसोड, जि. वाशिम) असं पत्नीच्या मृत प्रियकराचं नाव आहे.

कैलास मारूती बनसोडे यांनी याबाबत फिर्याद दिल्यानंतर पोलीसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कैलास बनसोडे यांची पाबळ चौकातील चाळीतली खोली आयुब शेख यानं 15 दिवसांपूर्वीच भाड्याने घेतली होती. या खोलीत आयुबची पत्नी त्याच्या तीन मुलांसह एकटी रहात होती. आयुब तिच्यासोबत रहात नव्हता. मोलमजुरी करून ती आपलं पोट भरत असे.

बुधवारी पहाटे बनसोडे यांना त्यांच्या मुलीचा फोन आला की, एक खोलीत 2 माणसांचं भांडण झालं असून एकानं दुसऱ्याच्या डोक्यात हातोडीनं वार केले आहेत. यानंतर बनसोडे ताबडतोब घटनास्थळी आले. यावेळी आयुबनं सांगितलं की, तो त्या महिलेचा पती आहे. त्याच्या पत्नीचे आणि मोईनचे अनैतिक संबंध होते. याच रागाच्या भरात त्याने हे कृत्य केल्याचं सांगितलं. यानंतर बनसोडे यांनी आयुबला कोंडून ठेवलं. तर मोईन दिलावर खान याला रुग्णालयात दाखल केलं. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सहाय्यक पोलीस निरीक्षक एन. बी. राणगट हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/