पत्नी ‘टाईट’ जीन्स पॅन्ट अन् टी-शर्टमध्ये ‘टंच’ दिसत, कामावर जात म्हणून पतीनं आवळला गळा’

डोंबिवली : पोलीसनामा ऑनलाईन – पत्नी जिन्स-टीशर्ट घालते म्हणून पतीनं तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. डोंबिवलीमधील हा संतापजनक प्रकार आहे. डोंबिवली पोलिसांनी पतीला या प्रकरणी अटक केली आहे. सुधीर जाधव असं या पतीचं नाव आहे.

सुधीर जाधव पत्नी सुजाता जाधवसोबत डोंबिवली नजीक कोपर परिसरात राहत होता. दोघांमध्ये नेहमीच वाद होत असत. दोघेही काम करतात. पत्नी सुजाता जिन्स टीशर्ट घातले म्हणून दोघांमध्ये वाद व्हायचा. कारण सुधीरचा त्याला विरोध होता. टाईट जीन्स अन् टीशर्ट घालून ती कामाला जात होती. कामाला जाताच ती खूपच सुंदर दिसत होती.

सुजाता मंगळवारी रात्री कामावरून आली होती दोघांमध्ये कपड्यावरून पुन्हा वाद झाला. दोघांमधील वाद एवढा वाढला की, सुधीरनं गळा आवळून तिला ठार करण्याचा प्रयत्न केला. सुजाता यावेळी बेशुद्ध पडली परंतु सुधीरला वाटलं तिनं जीव सोडला आहे. या घटनेनंतर सुधीर स्वत: रामनगर पोलीस ठाण्यात हजर झाला. सध्या सुजातावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शेजाऱ्यांनीच तिला रुग्णालयात दाखल केलं.

रामनगर ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश अहिरे यांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. सध्या पोलीस पुढील तपास करत आहेत. सध्या आरोपी सुधीर हा पोलिसांच्या ताब्यात आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/