पतीने केले पत्नीचे अश्लिल व्हिडिओ व्हायरल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पत्नीच्या दुस-या लग्नाला विरोध असल्याने पहिल्या पतीनेच आपल्या पत्नीचे अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी २५ वर्षांच्या महिलेने आपल्या पतीविरुद्ध फिर्याद दिली आहे़ समर्थ पोलिसांनी एरोल अलफ्रेडो अंताओ (रा़ गोवा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, ही घटना २०१६ ते १३ आॅगस्ट २०१८ दरम्यान घडली आहे. या दोघा पतीपत्नीत वादावादी होत असल्याने ते वेगवेगळे राहू लागले होते. महिला आपल्या पतीला सोडून गोव्याहून पुण्यात रहायला आली. बराच काळ वेगळे राहू लागले होते. काही काळाने त्यांनी घटस्फोट घेतला.

या घटस्फोटाबाबत एरोल नाराज होता. त्यात त्याने आपल्या पहिल्या पत्नीने दुसरा विवाह केल्याची माहिती त्याला मिळाली. पत्नीला धडा शिकविण्याच्या इराद्याने त्याने आपले पूर्वी काढलेले पती पत्नीच्या शारीरिक संबंधाचे व्हिडिओ त्याने पॉर्न साईटवर अपलोड केले. त्यावरुनही त्याचा राग शांत झाला नाही. त्याने बनावट फेसबुक अकाऊंट तयार केले व पहिल्या पत्नीचे मित्र मैत्रिणीला ते अश्लिल व्हिडिओ अपलोड करुन लिंक त्यांना पाठवून तिची बदनामी करण्याचा प्रयत्न केला.

नवी दिल्ली :भजी तळण्यावरून पतिपत्नीचे भांडण ; बेतले सासूच्या जीवावर 
याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निर्रीक्षक अरुण वायकर यांनी सांगितले की, पतीच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी गोव्यात राहायला असून त्याला अजून अटक करण्यात आलेली नाही. पत्नीच्या दुस-या विवाहामुळे रागाच्या भरात त्याने पत्नीचे अश्लिल व्हिडिओ व्हायरल केले आहेत.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=”]