पत्नी आणि सासूच्या छळाला कंटाळून जावयाची रेल्वेखाली आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पत्नी आणि सासूच्या छळाला कंटाळून एकाने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याच्या पाकिटात सुसाईड नोट सापडली असून त्यात पत्नी, सासू, मेव्हणा आणि पत्नीचा मित्र अशा चौघांमुळे आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी चौघांविरोधात समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महंमद असगर महंमद शरीफ शेख (वय ४०, रा. नाना पेठ) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीने नाव आहे. दोन एप्रिल २०१९ मध्ये संगम पुलाजवळ ही घटना घडली होती. या प्रकरणी महंमद शरीफ इस्माईल शेख (वय ६७, रा. नाना पेठ) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार मयताची पत्नी आसमा असगर शेख, सासू रजिया अन्सारी, पत्नीचा भाऊ परवेज अन्सारी व आणखी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून तो समर्थ पोलिसांकडे पाठविला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महंमद असगर व आसमा शेख, तिची आई, भाऊ व तिचा मित्र यांनी काही दिवसांपासून त्रास देण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे २ एप्रिल रोजी सायंकाळी असगर यांनी संगम पुलाजवळ रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. लोहमार्ग पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला तेव्हा त्यांना असगरच्या खिशात सुसाईड नोट मिळाली. त्यात माझ्या मृत्यूला पत्नी आसमा, सासू, मेव्हणा आणि तिचा मित्र जबाबदार असल्याचे म्हटले आहे. त्यावरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपासाला सुरुवात केली. चौकशी करून लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून तो समर्थ पोलिसांकडे चौकशीसाठी वर्ग करण्यात आला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like