हैदराबाद रेप केस : एन्काऊंटर झालेल्या 4 आरोपींपैकी ‘हा ‘सराईत गुन्हेगार, धक्कादायक माहिती उजेडात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हैदराबाद बलात्कार आणि हत्याप्रकरणातील आरोपींचा काल पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला. यात चारही आरोपींचा पोलिसांनी खात्मा केला गेला. आता यातील आणखी काही बाबी समोर येत आहे. या चार एन्काऊंटर करण्यात आलेल्या आरोपीपैकी एक आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांकडूंन सांगण्यात आले. या आरोपीचे नाव मोहम्मद आरिफ आहे.

या 4 पैकी एका असलेल्या मोहम्मद आरिफ या आरोपीवर कर्नाटक, आंध्रप्रदेशात विविध गुन्हे दाखल आहेत असे समोर आले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोहम्मद आरिफ हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या नावे आतापर्यंत जवळपास 9 गुन्हे दाखल असल्याचा अंदाज आहे.

या आरोपीबाबात आणखी माहिती समोर येत आहे त्यानुसार हा आरोपीत सतत आपले सिम कार्ड बदलत असे. आतापर्यंत या आरोपीने 11 वेळा आपले सिम बदलले होते.

काय आहे प्रकरण –
पोलिसांनी माहिती दिली की हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींना तपासासाठी घटनास्थळी नेण्यात आले होते. आरोपींनी पोलिसांवर हल्ला करुन तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. ते चौघे पळून जाण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार केला, त्यात आरोपी ठार झाले असे सायबराबादचे पोलीस आयुक्त व्ही सी सज्जनार यांनी सांगितले.

काय होती घटना –
हैदराबादमध्ये एका डॉक्टर महिलेचा बलात्कार आणि हत्येचे प्रकरण समोर आले होते. यानंतर या घटनेतील चारही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपींची चौकशी सुरु असताना अनेक धक्कादायक खुलासे समोर आले होते.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like