नवी दिल्ली : Hypertension | हायपरटेन्शन हे हाय ब्लड प्रेशर म्हणून ओळखले जाते. ही एक अशी मेडिकल स्थिती आहे ज्यामध्ये रक्तवाहिन्यांमध्ये ब्लड प्रेशर असामान्यपणे असतो. ही सायलेंट किलर स्थिती हृदयावर आणि एकूणच आरोग्यावर नकारात्मक परिणाम करते.(Hypertension)
हाय ब्लड प्रेशर प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यासाठी, त्याचे प्रकार, टप्पे आणि ते नियंत्रणात ठेवण्यासाठी धोरण समजून घेणे आवश्यक आहे.
ब्लड प्रेशरचे ४ टप्पे
१. नॉर्मल ब्लड प्रेशर :
या टप्प्यात, ब्लड प्रेशर रीडिंग सामान्यतः १२०/८० मिमी एचजी खाली येते. नॉर्मल ब्लड प्रेशरसंबंधित कोणतीही महत्त्वाची जोखीम नाही. हाय ब्लड प्रेशर टाळण्यासाठी निरोगी जीवनशैली राखावी.
२. प्री-हायपरटेन्शन :
हा एक प्रारंभिक इशारा देणारा टप्पा आहे, यात ब्लड प्रेशर रीडिंग १२०-१३९/८०-८९ मिमी एचजी पर्यंत असते. हा अद्याप हाय ब्लड प्रेशर म्हणून वर्गीकृत केलेला नसला तरी, हा हाय ब्लड प्रेशर विकसित होण्याचा धोका दर्शवतो. वाढ रोखण्यासाठी या टप्प्यावर आहारातील बदल, नियमित व्यायाम आणि तणाव व्यवस्थापन यासारख्या बदल जीवनशैलीत करणे आवश्यक आहे.
३. टप्पा १ हायपरटेन्शन :
या टप्प्यात ब्लड प्रेशरचे रीडिंग १४०-१५९/९०-९९ मिमी एचजी दरम्यान असते. हे हाय ब्लड प्रेशरची सुरुवात दर्शवते. ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यासाठी, संबंधित आरोग्य धोके कमी करण्यासाठी जीवनशैलीत बदल तसेच औषधोपचार आवश्यक असू शकतात.
४. टप्पा २ हायपरटेन्शन :
ही सर्वात गंभीर अवस्था आहे, ज्यामध्ये ब्लड प्रेशर रीडिंग सातत्याने १६०/१०० मिमी एचजी पेक्षा जास्त असते. अशा स्थितीत ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी आणि हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि किडनीच्या समस्यांसारख्या गुंतागुंत टाळण्यासाठी तत्काळ डॉक्टरांची आवश्यकता असते.
हाय ब्लड प्रेशर रोखण्याचे उपाय
निरोगी वजन राखा
हाय ब्लड प्रेशरसाठी लठ्ठपणा हा एक प्रमुख जोखीम घटक आहे. वजन जास्त असल्यास, वजन कमी केल्याने ब्लड प्रेशर कमी होईल.
नियमित व्यायाम करा
व्यायामामुळे ब्लड प्रेशर कमी होण्यास आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. दर आठवड्याला किमान १५० मिनिटे मध्यम-तीव्रतेचा एरोबिक व्यायाम किंवा ७५ मिनिटे उच्च-तीव्रतेचा एरोबिक व्यायाम करा. याव्यतिरिक्त, आठवड्यातून किमान दोनदा स्नायू मजबूत करणारे व्यायाम करा.
निरोगी आहार घ्या
निरोगी आहार हृदयाचे आरोग्य सुधारण्यास आणि हाय ब्लड प्रेशरचा धोका कमी करण्यास मदत करतो.
आहारात फळे, भाज्या, धान्य आणि कमी फॅटच्या प्रोटीनचा समावेश करा. मिठाचे सेवन मर्यादित करा.
धूम्रपान करू नका
धूम्रपान हा हाय ब्लड प्रेशरचा प्रमुख जोखीम घटक आहे. धूम्रपान सोडल्याने ब्लड प्रेशर कमी होण्यास मदत होते.
तणाव कमी करा
तणावामुळे ब्लड प्रेशर वाढते. तणाव व्यवस्थापन जसे की योग, ध्यान किंवा प्रशिक्षित थेरपिस्टशी बोलण्याने मदत
होऊ शकते.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Heart disease : रोज प्यायलात इतकी दारू तर हृदय रोगापासून होईल बचाव, कोलेस्ट्रॉल सुद्धा नाही वाढणार