Heart disease : रोज प्यायलात इतकी दारू तर हृदय रोगापासून होईल बचाव, कोलेस्ट्रॉल सुद्धा नाही वाढणार

नवी दिल्ली : Heart disease | मर्यादेत मद्यपान केल्याने हृदयाचे आरोग्य सुधारू शकते. मात्र, याचा अर्थ असा नाही की तुम्ही आजपासूनच दारू पिण्यास सुरुवात करावी. ही माहिती फक्त त्या लोकांसाठी आहे जे रोज दारू पितात. रोज दारू पिणाऱ्यांनी ठराविक मर्यादेत दारू प्यायल्यास त्यांना हृदयविकाराचा धोका कमी होतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. याशिवाय खराब कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते. मात्र, प्रत्येक व्यक्तीसोबत हे घडतेच असे नाही.(Heart disease)

किती दारू आरोग्यासाठी फायदेशीर?
फोर्टिस एस्कॉर्टस हार्ट इन्स्टिट्यूटमधील इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजी डिपार्टमेंटचे डॉ. विशाल रस्तोगी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, महिलांनी दररोज एक ड्रिंक आणि पुरुषांनी दोन ड्रिंक घेणे खूप फायदेशीर आहे. जर या प्रमाणात अल्कोहोलचे सेवन केले तर ते हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

यामुळे शरीरातील गुड कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. मात्र, याचा अर्थ असा नाही की जे लोक दारूचे सेवन करत नाहीत त्यांनी ती सुरू करावी. तसेच रोज एवढी दारू प्यावीच असेही नाही. अल्कोहोलच्या बाबतीत, प्रत्येक व्यक्तीची शारीरिक प्रतिक्रिया आणि त्याचा शरीरावर होणारा परिणाम अनेक घटकांवर अवलंबून असतो.

खाणेपिणे आणि इतर घटक
दारू संबंधित जोखीम आणि फायद्यांच्या बाबतीत व्यक्तीचा आहार, व्यायाम आणि धूम्रपानाच्या सवयी हे मोठे फॅक्टर आहेत. म्हणजेच रोज व्यायाम करणारे, चांगली जीवनशैली आणि उत्तम खाण्याच्या सवयी असणारे, धूम्रपान न करणारे लोक जर मर्यादित प्रमाणात मद्यपान करत असतील तर त्यांच्या शरीरावर सामान्य माणसाइतका गंभीर परिणाम होत नाही.

जास्त पिण्याचे तोटे
जास्त प्रमाणात दारू पिणे खूप धोकादायक ठरू शकते. त्यामुळे बीपी वाढतो आणि हृदयाचे ठोकेही अनियमित होतात.
स्ट्रोकचा धोकाही असतो. दारू लिव्हरचे नुकसान करते आणि पचन रोग आणि लिव्हर सिरोसिसचा धोका असतो.

हार्टच्या चांगल्या आरोग्यासाठी करा या गोष्टी
अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार, हार्टला फिट ठेवण्यासाठी चांगला आहार, व्यायाम आणि तंबाखूचे सेवन न
करण्याचा सल्ला दिला जातो. ज्यांना आधीच हृदयविकार आहे त्यांनी कोणत्याही प्रकारे मद्यपान टाळावे.
या प्रकरणात डॉक्टरांचा सल्ला घेणे देखील महत्त्वाचे आहे. दररोज जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने कॅन्सरचा धोका
वाढतो आणि मेन्टल हेल्थ सुद्धा बिघडते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Heart Health : हृदयाची घ्यायची असेल चांगली काळजी, तर आजच ताटात या सुपर फूड्सचा करा समावेश, नेहमी राहाल निरोगी

Capsicum Side Effects | Capsaicin युक्त शिमला मिरची जरा सांभाळून खा, जास्त खाल्लास आरोग्याचे होईल असे नुकसान

Pune Ganpati Visarjan Miravnuk 2023 | पुण्यातील विसर्जन मिरवणुक मार्गावर साकारली सायबर क्राईमवर आधारित रांगोळी