‘तुझ्या बापाचा नोकर नाहीय’, रात्री मदतीसाठी फोन येताच वरुण गांधी भडकले

उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेश म्हणजे गुन्हेगारांसाठी आंदणच झालेले आहे. गुन्हेगारांनी गुन्हे करायचे आणि राजकीय पुढाऱ्यांनी त्यांना वाचवायचे असे समीकरणच बनले आहे. याच उत्तर प्रदेशमधील पीलभीतचे भाजपचे खासदार वरुण गांधी यांचा एक ऑडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये वरुण गांधी एका व्यक्तीवर भडकले आहत. त्याने रात्री दहा वाजता मदतीसाठी फोन केला होता. महत्त्वाचे म्हणजे तो दारूची तस्करी करत होता.

व्हायरल ऑडिओमध्ये एका बाजुने वरुण गांधी बोलत असून दुसरा व्यक्ती ठाणा क्षेत्रात राहणारा सर्वेश नावाचा अवैध दारुची विक्री करणारा व्यक्ती आहे. या ऑडिओमध्ये वरुण गांधी सर्वेशवर भडकलेले ऐकायला मिळत आहेत. मी तुझ्या बापाचा नोकर नाहीय, अशा शब्दांत गांधी यांनी दारु तस्कराला सुनावले आहे. सर्वेशच्या घरावर रात्री पोलिसांनी छापा मारला होता. त्याच्या घरामध्ये अवैधरित्या दारुचा साठा मिळाला होता. तो घरातून दारुची विक्री करत होता.

पोलिसांनी कारवाई करत सर्वेशला ताब्यात घेतले. तसेच त्याला सुनगढीच्या आसमरोड पोलीस ठाण्यात घेऊन गेले. याठिकाणी त्याने पोलिसांना खासदरांना फोन करणार असल्याचे सांगितले. रात्री दहा वाजता सर्वेशने खासदार वरुण गांधी यांना फोन केला. यावेळी वरुण गाधी यांनी त्याला चांगलेच झापले. या प्रकारचा ऑडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. आता हा ऑडिओ पोलिसांनी किंवा सर्वेशने व्हायरल केला की वरुण गांधी यांनी हे समजू शकलेले नाही.

दुसरीकडे समाजवादी पक्षाचे नेते सुनिलसिंह यादव यांनी वरुण गांधी यांच्यावर टीका केली आहे. यादव यांनी ट्विट करुन सांगितले की, वरुण गांधी जनतेला सांगत आहेत की, मी तुमच्या बापाचा नोकर नाहीय. वरुणजी गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयाने सांगितले की, सरकार जनतेचे सेवक असतात शासक नाही. मात्र, सामंतवाद भाजपची परंपरा आहे. मागास जातीचे लोक तुमच्यासाठी साप-उंदरासारखे आहेत. आता कोण कोणाचा बाप आणि कोण नोकर याचे उत्तर तुम्हाला जनताच देईल, असे म्हटले आहे.