‘मी नॉट रिचेबल नव्हतो, माझा फोन सुरू होता’, नाराजी दूर झाल्यानंतर वडेट्टीवारांचं ‘स्पष्टीकरण’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – “मी नॉट रिचेबल नव्हतो माझा फोन सुरू होता. कुटुंबासोबत असताना 24 तास वापरू शकत नाही,” असे म्हणत काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपल्या नॉट रिचेबल असण्यावर स्पष्टीकरण दिले आहे. वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी आपल्या भावना मांडल्या.

काँग्रेसचे नेते आणि ओबीसी खात्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांची नाराजी अखेर दूर झाली आहे. आजच त्यांनी आपल्या खात्याचा पदभार स्विकारला आहे. अखेर पाच दिवसांनंतर त्यांची नाराजी दूर झाली आहे. आज त्यांनी मदत व पुनर्वसन खात्याचा पदभार स्विकारला आहे.

माध्यामांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, “मी नॉट रिचेबल नव्हतो माझा फोन सुरू होता. कुटुंबासोबत असताना 24 तास नाही वापरू शकत. कुटुंबालाही थोडा वेळ द्यायला हवा. 3 महिने झाले मी कुटुंबाला वेळ दिला नव्हता. म्हणून मी दोन तीन दिवस कुटुंबासोबत वेळ घालवला. दुपारनंतर पुन्हा मी कुटुंबासोबत वेळ घालवणार आहे. माझी काही वैयक्तीक कामे आहेत तीही मला पार पाडायची आहेत. हे सगळं करून सोमवारपासून टी-20 मॅच सुरू.” असेही वडेट्टीवारांनी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/