‘मी’ लोकसभा निवडणूक लढवणार नाही : राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

आगामी लोकसभा निवडणुकीकरता सर्व पक्षात उमेदवारीसाठी नियोजन आणि बैठका सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस चे पक्षप्रमुख शरद पवार यांनी लोकसभा लढवणार नाही असे स्पष्ट केले. त्यापाठोपाठ पक्षातील जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी देखील आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे एका मराठी वृत्तवाहिनिशी बोलताना सांगितले.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7a3ed0a8-cd1e-11e8-965d-c3a8c0e83f44′]

“आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाही, मात्र पवार साहेबच काय तो अंतिम निर्णय घेतील,” असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच “बाळासाहेब असते तर कमळाबाईसोबतचे संबंध कधीच तोडले असते,” असा टोलाही त्यांनी शिवसेनेला लगावला. भुजबळांची खासियत म्हणजे ते भाजपाला कमळाबाई असे संबोधतात.
[amazon_link asins=’B072SWSQ1F’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d19ce582-cd23-11e8-be05-f331b85fb155′]

यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, “नाशिकमधील जवळजवळ सगळ्याच कार्यकर्त्यांनी सांगितलं की भुजबळ आम्हाला उमेदवार म्हणून हवे. पण मी निवडणूक लढवणार नाही हे मी एक महिन्यापूर्वीच नाशिकमध्ये जाहीर केलं होतं. कोणी कुठे उभं राहावं, याबद्दल पवारसाहेबांचे आडाखे असतात, त्यांचा एक अभ्यास असतो. काही वेळेला सर्व्हे केला जातो, परिस्थिती पाहिली जाते. शेवटी पक्षप्रमुखाला हे सगळे विचार करावे लागतात. कोणी कुठे काम करावं, कुठल्या पदावर काम करावं. त्याप्रमाणे शरद पवार शेवटचा निर्णय घेतील. तो आम्हा सगळ्यांना मान्य करावा लागेल.”
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8101ecea-cd1e-11e8-999f-9b5336dca8b5′]

“शिवसेनेने निर्णय घेण्याची वेळ आता आहे. आणखी किती दिवस तळ्यात-मळ्यात करणार. यासाठी निश्चितपणे सीमा आहे. सरकारमध्ये राहून विरोधी भूमिका घ्यायचं, असं होत नसतं. ‘सामना’तून टीका होत असते हे आम्ही पाहतो. उद्धव ठाकरेही फार कठोर टीका करत असतात. बाळासाहेब आता असते तर अशी टीका करुन कमळाबाईपासून कधीच फारकत घेतली असती,” असा टोलाही भुजबळ यांनी शिवसेनेला लगावला.