IAS Dr. Suhas Divase | IAS अधिकारी डॉ. सुहास दिवसे पुण्याचे नवीन जिल्हाधिकारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – IAS Dr. Suhas Divase | Pune Collector राज्य सरकारने आज पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांची बदली केली आहे. तर आयएएस अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची पुण्याचे नवीन जिल्हाधिकारी (Pune Collector) म्हणून नियुक्ती केली आहे. डॉ. दिवसे (IAS Dr. Suhas Divase) यांच्या नियुक्तीचे आदेश अपर मुख्य सचिव (सेवा) नितीन गद्रे यांनी बुधवारी (दि.7) काढले आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनात मोठे फेरबदल केले जात आहेत. पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांची पदोन्नतीने बदली करण्यात आली. त्यांच्या जागी आयपीएस अमितेश कुमार (IPS Amitesh Kumar) यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर विभागीय आयुक्त सौरभ राव यांची बदली करण्यात आली. त्यानंतर आता पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांची बदली करण्यात आली आहे.

डॉ. राजेश देशमुख यांच्यानंतर डॉ. दिवसे हे जिल्हाधिकारी म्हणून जबाबदारी स्वीकारणार आहेत. डॉ. राजेश देशमुख यांची बदली क्रीडा व युवक कल्याण आयुक्तपदी करण्यात आली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC News | हिल टॉप हिल स्लोप येथील अनधिकृत इमारतीवर पुणे पालिकेची कारवाई

‘गॅस रीफिलिंग’ करणाऱ्या दोघांना चिखली पोलिसांकडून अटक

देशी कट्टा बाळगणाऱ्या गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक, कट्टा व एक काडतुस जप्त

बंडगार्डन, हडपसर परिसरातील अपघातात दोन जणांचा मृत्यू

किरकोळ कारणावरुन तरुणाला लाकडी बांबूने बेदम मारहाण; येरवडा परिसरातील घटना

किरकोळ कारणावरुन कुटुंबाला मारहाण, दोघांना अटक; हडपसर परिसरातील घटना

Latur Crime News | पोलीस ठाण्यात अधंश्रद्धेचा धक्कादायक प्रकार, गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण कमी होण्यासाठी चक्क बोकडाचा बळी; बिर्याणीही बनवून खाल्ली