एक गाव ‘जिथं’ प्रत्येक घरात ‘IAS’, ‘IPS’ अधिकारी, जगभरात होतेय ‘चर्चा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जेव्हा आयएएसचा निकाल लागतो आणि त्यामध्ये जिल्ह्याचा किंवा गावाचा उल्लेख असतो त्यावेळी त्या अधिकाऱ्यांबाबत संपूर्ण जिल्ह्याला अभिमान वाटत असतो. मग एका गावातील लोकांना किती आनंद होत असेल ज्या गावातील प्रत्येक घरामध्ये एक आयएएस अधिकारी आहे. युपीच्या लखनौ मधील माधोपट्टी गावामध्ये एकूण 75 घर आहेत आणि येथे 47 लोक आयएएस आणि आयपीएस अधिकारी आहेत.

एवढेच नाही तर येथील लोक बँक आणि सेनेतील मोठ्या मोठ्या हुद्द्यावर कामाला देखील आहेत. संपूर्ण देशातील तरुणांसाठी प्रेरणास्रोत असलेल्या या गावाची कहाणी 1914 पासून सुरु झालेली आहे. यावर्षी येथून पीसीएसमध्ये मुस्तफा हुसेनची निवड झाली आणि त्यानंतर ही मालिका सतत सुरू आहे. या गावात मुस्तफाने सुरू केलेली प्रथा अजूनही गावातील तरुणांनी कायम ठेवली आहे.

1952 मध्ये या गावातील इन्दुप्रकाश आयएएस झाले यानंतर तर जणू येथील तरुणांमध्ये मोठा उत्साह संचारला. इंदू फ्रांस सारख्या अनेक देशांमध्ये भारताचे राजदूत म्हणून देखील होते. इंदूनंतर विनयसिंग आणि विनय यांच्यानंतर शशिकांत हे 1964 मध्ये आले आणि त्यानंतर शशिकांत यांचा मुलगा 2002 मध्ये आयएसमध्ये 31 व्या क्रमांकावर पोहोचला. 2013 मध्ये गावची सून शिवानी सिंगने पीसीएस परीक्षा उत्तीर्ण केली आणि गावा गावात तिच्या चर्चा सुरु झाल्या. या गावातील बावीस वर्षीय अमित पांडे यांनी पाच पुस्तके देखील लिहिलेली आहेत.येथे जन्मलेला प्रत्येक व्यक्ती मोठ्या हुद्द्यावर कामाला आहे. गावात जेव्हा एखादा बाहेरील व्यक्ती येतो तेव्हा येथील कहाणी नक्की ऐकून जातो.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/