ICICI बँकेच्या कर्मचार्‍यांना पगारवाढीचे गिफ्ट’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनामुळे बहुतांश कंपन्या कर्मचार्‍यांच्या पगारात कपात करत आहेत. पण, देशातील दुसरी सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या आयसीआयसीआय बँकेने मात्र आपल्या कर्मचार्‍यांना गुड न्यूज दिली आहे.

बँकेने आपल्या 80 हजार ‘फ्रंटलाइन’ कर्मचार्‍यांचा पगार वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या संकटकाळात काम केलेल्या 80 हजार कर्मचार्‍यांना गिफ्ट देण्यात आले आहे. त्यांच्या पगारात 8 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.

आयसीआयसीआय बँकेने पगारात वाढ झालेले सर्व कर्मचारी एम1 आणि त्याखालील श्रेणीतील आहेत. यातील बहुतांश फ्रंटलाइन कर्मचारी आहेत, ज्यांचा थेट ग्राहकांशी संबंध येतो. याबाबत बँकेशी इमेलद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला पण त्यावर उत्तर मिळालेले नाही. आर्थिक वर्ष 2020-21 साठी ही पगारवाढ करण्यात आली असून जुलै महिन्यापासून ही वाढ लागू होईल.