निर्सगाचा मानवाला संदेश ! जर आत्ताच नाही सुधारणा झाली तर ‘सर्वानाश’ जास्त नाही दूर

पोलीसनामा ऑनलाईन : पृथ्वी आपल्याला आपल्या गरजा भागवण्यासाठी सर्व प्रकारची साधनं उपलब्ध करते, परंतु लोभ पूर्ण करण्यासाठी नाही, असे महात्मा गांधींचे विधान आहे. दुसर्‍या महायुद्धानंतर संपूर्ण जग आर्थिक विकासाच्या शर्यतीत इतके पुढे गेले की निसर्ग आणि जीव यांच्या संबंधाकडे दुर्लक्षच करत राहिले. मानवाला निसर्गाचे शोषण करण्याचा जणू हक्कच मिळाला आहे असे दिसते. निसर्गात आज अशी कोणतीही गोष्ट नाही ज्याचा मानवाने व्यापार केला नसेल, मग ती हवा असो की पाणी. मानवाच्या याच लोभामुळे आज सर्व मानवजातीवर संकट उभे उभे ठाकले आहे आणि त्याने जगभरातील कोट्यावधी लोकांना ठार केले आहे.

माणसाने आपल्या गरजा भागवण्यासाठी नैसर्गिक स्त्रोतांचा वापर केला असता तर ठीक होते, परंतु तसे झाले नाही. मनुष्याला निसर्गाला आपला गुलाम बनवायचे होते, फायद्यासाठी जंगल तोडायचे, जंगलांना आग लावायची, खनन करणे, पाण्याचा अतिरिक्त वापर करून एकप्रकारे पाण्याचे सशोषण करणे, प्रदूषण पसरवणे इ. मानवाने निसर्गाच्या कामांमध्ये अडथळे निर्माण करण्यास सुरवात केली. असे केल्याने मनुष्याला खात्री होती की त्याने निसर्गाचा पूर्णपणे पराभव केला आहे. पण कदाचित तो विसरला असावा की निसर्ग चिरंतन आहे. परिणामी निसर्गाद्वारा फटका तर बसणारच होता.

एका सर्वेक्षणातून हे स्पष्ट झाले की सुमारे 47 टक्के लोकांचा असा विश्वास आहे की हा निसर्गाचा केवळ मानवाला एक संदेश आहे की अजूनही आपण सुधारत नसाल तर संपूर्ण विनाश फार दूर नाही. निसर्गाने यापूर्वी देखील मानवजातीला अनेक आपत्तींच्या माध्यमातून सावध केले आहे. जसे की बर्ड फ्लू, स्वाइन फ्लू, निपाह विषाणू, सार्स, मार्स इ. याप्रमाणेच आता कोरोना विषाणू देखील जगात त्याचे भयावह रूप दाखवत आहे.

महामारी केवळ आपत्तीजनकच नाही तर मानवजातीला मोठे शिक्षण देण्याचे काम देखील करते, परंतु उपभोक्तावादी मानसिकता असणारे आणि आर्थिक विकासाच्या शर्यतीतल्या अहंकारी माणसाने निसर्गाच्या शिक्षणापासून आपले मन बदलण्याचा कधी प्रयत्न केला नाही. परिणामी आज कोरोनासारखी जागतिक महामारी मानवजातीला अशी शिक्षा देत आहे की लोभी होऊ नका आणि निसर्गाचा नाश करु नका.

या आपत्तीने मानवाला हे शिकवण्याचा देखील काम केले आहे की, जे महान योगी, ऋषि हजारो वर्षांपूर्वी संदेश देत असत की स्वत:ला आणि पर्यावरणाला स्वच्छता प्रदान करा. कदाचित हेच कारण आहे की भारतीय पारंपारिक समाजातील लोक आपल्यासोबत टॉवेल ठेवत असत आणि अनेकदा खोकताना त्यास तोंडाला लावत असत. 1991 पासून देशात आर्थिक उदारीकरण सुरू झाले, त्यानंतर मानवाची गरज वाढतच गेली, पण सध्याच्या लॉकडाउनने जीवनाचा आदर्श रूप दर्शविण्याचा प्रयत्न केला आहे.

भारतातील ऋषि आणि मुनींनी हा संदेश नेहमीच दिला आहे की स्वत: खाण्यापूर्वी आजूबाजूस कुणी उपाशी तर नाहीना ते पहा आणि आज आपत्कालीन परिस्थितीतही तोच संदेश दिला जात आहे. आपल्याला असे वाटत नाहीका की आपण पुन्हा आपल्या आदर्श आयुष्याकडे परत जात आहोत. जागतिकीकरणाचा परिणाम म्हणून आज संपूर्ण जग कुठे आहे? या परिणामामुळे आपल्याला काय मिळाले आणि आपण काय गमावले?

म्हणूनच, आजच्या परिस्थितीने आपल्या सर्वांना पुन्हा एकदा स्थानिकीकरणाच्या दिशेने विचार करायला भाग पाडले आहे. आता अशी वेळ आली आहे की आपण स्थानिक वस्तूंना प्राधान्य दिले पाहिजे. निसर्ग मानवजातीकडून नेहमीच मैत्रीपूर्ण वर्तनाची अपेक्षा करतो, परंतु माणूस अत्यधिक उपभोक्ता असल्याने त्याला वेळोवेळी निसर्गाच्या कोपाला सामोरे जावे लागते.