तुमच्या फोनमधील ‘हे’ फंक्शन ‘तात्काळ’ बंद करा, अन्यथा ‘हॅकर्स’ उचलतील फायदा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुमच्याजवळ अँड्रॉइड 8.0 हा फोन असेल तर तुम्हाला नवीन समस्येला सामोरे जाऊ लागू शकते. हॅकर्स यामध्ये एनएफसी बीमिंगचा वापर करत व्हायरस सोडत आहेत. गुगलने यासाठी मोठ्या प्रमाणात काम केलं असून अजूनही याचा धोका मोठ्या प्रमाणात आहे. हा व्हायरस अँड्रॉइड 8.0 ओरियो आणि यांच्यानंतर आलेल्या व्हर्जनमध्ये हा व्हायरस फार प्रभावी ठरत असून दोन फोन शेजारी असतील तर मोठ्या फाईल्स ट्रान्स्फर करणे फार सोपे होऊन जाते. त्याचबरोबर अँड्रॉइड बीममुळे त्या ऑटोमेटिक ट्रान्सफर होत असल्याने मोबाइलधारकांचा खासगी डेटा सहज चोरी केला जाऊ शकतो.
अँड्रॉइड बीम यूजर्समुळे एपीके फाइल्स कॉपी करणे सोपे जाते. प्रत्येकवेळी या फाईल्स ट्रान्स्फर होताना तुम्हाला नोटिफिकेशन येते. मात्र या व्हायरसमुळे तो येत नसून थेट या फाईल्स ट्रान्स्फर होतात. या व्हायरसचा शोध Y. Shafranovich यांनी लावला असून त्यांनी याच्या दुष्परिणामांचा देखील शोध लावला आहे.

असा करा बचाव –

ज्या मोबाइलधारकांकडे एनएफसी एनेबल्ड डिवाइस आहे त्यांना लेटेस्ट सुरक्षा अपडेट्स करणे गरजेचे आहे. गुगल आणि इतर कंपन्या देखील वेळोवेळी अपडेट्स आणत असतात, मात्र तुमच्या मोबाईलमध्ये हे अपडेट्स नसतील तर तुमचे एनएफसी बंद होऊ शकते.

काय आहे एनएफसी –

एनएफसी एक प्रकारचा कम्युनिकेशन प्रोटोकॉल असून याद्वारे दोन यंत्रणांमध्ये कम्युनिकेशन होते. तुम्ही कोणतेही पैसे देताना याचा मोठा धोका असतो. त्यामुळे हे अपडेट्स असणे फार गरजेचे आहे.

असे बंद करा एनएफसी –

एनएफसी बंद करण्यासाठी तुम्हाला फार सोपे काम करावे लागणार आहे. वाय- फाय ब्लूटूथसारखे याला बंद करणे देखील फार सोपे काम आहे. यासाठी तुम्हाला सर्वात आधी सेटिंगमध्ये जावे लागेल. त्यानंतर कनेक्टेड डिवाइसमध्ये जाऊन टॉगल डिवाइस बंद करण्यात यावे.

Visit : Policenama.com