बेकायदेशीर गर्भपात प्रकरण : कोल्हापूरच्या ‘त्या’ हॉस्पिटलमधून डॉ. चौगुलेंचा पत्ता

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन 

कोल्हापूरमधील एका हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्याने गणेशनगरमधील डॉ. चौगुलेंचा पत्ता दिल्याचे तपास उघड झाले आहे. याप्रकणातील दोषींची गय केली जाणार नसल्याची माहिती पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

चौगुले हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीर गर्भपाताचा अड्डा उघडकीस आल्यानंतर मुख्य संशयित डॉ. रूपाली आणि तिचा पती विजयकुमार चौगुले यास पोलिसांनी अटक केले आहे. तसेच हॉस्पिटलची तपासणी केल्यानंतर तेथे मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे गर्भपात केलेल्या माहिलांची चौकशी करण्यात आली. त्यात सांगलीतील एक महिला गर्भपात करण्यासाठी कोल्हापूरमधील एका हॉस्पिटलमध्ये गेल्या होत्या. त्यावेळी तेथील डॉक्‍टरांनी गर्भपात करण्यास नकार दिला. त्यानंतर तेथीलच एका कर्मचाऱ्याने गणेशनगरमधील चौगुले हॉस्पिटलचा पत्ता त्या जोडप्यास दिला. त्यानंतर याठिकाणी गर्भपात करण्यात आल्याचे, अधीक्षक शर्मा यांनी सांगितले.

ते म्हणाले,”गर्भपात प्रकरण हे गंभीर आणि संवेदनशील आहे. याचा दररोज आढावा घेतला जात आहे. तपासात काही मुद्देही हाती लागले आहे. यातील दोषी शासकीय सेवेतील असले तरीही त्यांची गय केली जाणार नाही. तपास मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे गर्भपात करण्यात आलेल्या महिलांचे जबाब नोंदवून घेतले जात आहेत. या फसार डॉ. स्वप्नील जमदाडे याच्या शोधासाठी पोलिस पथक रवाना करण्यात आले आहेत.” यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे उपस्थित होते.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e1f3f7d5-bcd8-11e8-abb7-ad584a089770′]

मानसिकता बदलण्याची गरज : शर्मा

अधीक्षक सुहैल शर्मा म्हणाले,”आपल्याला मुलगी नको, यासाठी गर्भपात केले जातात. ही खेदाची बाब आहे. पती-पत्नींची मानसिकता बदलण्याची गरज आहे. मुलगी, मुलगा समान ही भावना निर्माण झाल्यानंतर चौगुले हॉस्पिटलचे धंदे बंद होतील.”

समिती तयार करणार : शर्मा

अधीक्षक सुहैल शर्मा म्हणाले,”रूग्णालयातील बेकायदेशीर प्रकार थांबवण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाचे पथक कार्यरत असते. परंतू गणेशोत्सवानंतर पोलिसांकडून एक पथक तयार केले जाईल. त्यात पोलिस आणि महापालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी असतील.”

उत्तर प्रदेश पोलिसांचा अजब कारनामा; एन्काऊंटर पाहण्यासाठी चक्क पत्रकारांना निमंत्रण

[amazon_link asins=’B01DEWVZ2C,B07GB9Z17Z’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’94ade70d-bcd9-11e8-8450-a35bb7a51be5′]