दोन वाहनासह बनावट मद्यसाठा जप्त

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – होळी व धुळीवंदनासाठी हॉटेल, दुकानात विक्री करण्याच्या हेतूने केलेला मद्यसाठा धुळे पोलीसांनी जप्त केला. कमी दरात बनावट मद्यसाठा मिळवून त्यातून फायदा करून घेण्याच्या हेतूने गाड्यातुन वाहतुक करण्यात येणार असल्याची माहिती शहर पोलीसांना मिळाली.

संतोषी माता चौकात वाहनाची तपासणी करत असताना हुंदाई क्रेटा कार (क्रं.एम एच 18 / बी.सी.6242) हिच्या डिक्कीत बियरचे बॉक्स लपविले होते. तर काही वेळातच वोल्सव्हँगन कंपनीची व्हेंटो कार (क्रं.एम.एच.39 / जे 4939) या गाडीत मागील सिटावर देशीदारुचे टँगो पंच बाटल्या भरलेले खाेके मिळाले. दोन्ही वाहनातून विना परवाना मद्यसाठा वाहतूक करण्यात येत असल्याने या वाहनांमध्ये अनुक्रमे शेख फरीद अब्दुल लफीक (वय.33 रा. मोगलाई मिशन कंपाऊटजवळ साक्री रोड) व रामदास रविदास चञे (वय . 35, रा. इंदिरा नगर वलवाडी, स्टेडियमजवळ देवपुर, धुळे) दोघांना वाहनांसह एकूण अंदाजे 11 लाख 33 हजार 824 रूपये किंमतीचा मुद्देमाल पकडण्यात आला. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक विश्वास पांढरे, अप्पर पोलीस अधिकारी राजु भुजबळ, उपविभागिय अधिकारी सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक गणेश चौधरी, असई नाना आखाडे, असई हिरालाल बैरागी, पो. कॉ. प्रकाश पाटील, भिका पाटील, मच्छिंद्र पाटील, पो. ना. मुक्तार मन्सुरी, कबीरोद्दीन शेख, प्रल्हाद वाघ, योगेश चव्हाण, पो. ना. सतिष कोठावदे, रविंद्र गिरासे, अब्बास शेख, पंकज खैरमोडे, राहुल पाटील, कमलेश सुर्यवंशी यांनी केली.

Loading...
You might also like