Imli Serial Fame Hetal Yadav | ‘इमली’ फेम हेतल यादव यांचा भीषण अपघात

पोलीसनामा ऑनलाइन टीम : Imli Serial Fame Hetal Yadav | ‘इमली’ फेम अभिनेत्री हेतल यादव यांचा नुकताच गंभीर अपघात झाला आहे. रविवारी रात्री शूटिंगवरून घरी परतत असताना हा अपघात झाला आहे. त्यांच्या कारला ट्रकने जोरदार धडक दिल्यामुळे हा अपघात झाला आहे. मात्र, हेतल यादव या अपघातातून सुखरूप बचावल्या आहेत. (Imli Serial Fame Hetal Yadav)

 

हेतल यादव या आपले शूटिंग संपवून घरी परतत होत्या. यावेळी स्वतः गाडी चालवत होत्या. त्यावेळी अचानक मागून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. यावेळी हेतल यादव या अपघाताबद्दल म्हणाल्या की, “रात्री पावणे नऊ वाजता माझं शूटिंग संपलं आणि मी फिल्मसिटीहून घराकडे निघाले. मी JVLR महामार्गावर पोहोचताच एका ट्रकने माझ्या कारला मागून धडक दिली आणि माझी गाडी एका बाजूला ढकलली गेली.” आणि हा भीषण अपघात झाला. सुदैवाने मला दुखापत झाली नाही, पण अजूनही मी त्या धक्क्यातून बाहेर आलेले नाही,” असेदेखील त्या म्हणाल्या.

हेतल गेल्या 25 वर्षांपासून अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत ‘ज्वाला’ची भूमिका साकारत त्यांनी
लोकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली होती. त्यांच्या या भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले.
तर आता त्या स्टार प्लस वाहिनीवरील ‘इमली’ या मालिकेत शिवानी राणाची भूमिका साकारत आहेत.
त्यांच्या या भूमिकेचेदेखील सर्वत्र कौतुक होत आहे.

 

Web Title :- imli serial fame hetal yadav had an accident while returning home from shooting

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Raj Thackeray | ‘आपण महापुरुषांना संकुचित दृष्टिकोनातून पाहतो’; महापरिनिर्वाणदिनी राज ठाकरेंचे जनतेला आवाहन

Nashik ACB Trap | 51 हजारांची लाच स्वीकारताना ठेकेदार पोलिसांच्या जाळ्यात; नाशिकमधील प्रकार

U-19 Women’s T20 WC | शफाली वर्माची Under 19 विश्वचषकासाठी महिला संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती

Aurangabad ACB Tap | लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकासह कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात