100% संपला ‘हा’ अपराध, आत्महत्या आणि रस्ते अपघात देखील झाले कमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एकीकडे कोरोना विषाणूमुळे जगभरात २ लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे गुन्हे, रस्ते अपघात आणि आत्महत्येमुळे होणारे मृत्यू देखील कमी झाले आहेत. भारतात तर देशव्यापी लॉकडाऊन लागू होऊन एक महिन्याहून अधिक काळ झाला आहे. केंद्राने लॉकडाऊन लागू केल्यामुळे देशात कोरोना संक्रमणाला आळा घालण्यात यश आले आहे, या लॉकडाऊनचा आणखी एक सकारात्मक परिणाम म्हणजे मानवी हस्तक्षेपामुळे होणारे मृत्यू देखील कमी झाले आहेत. मात्र यामुळे आर्थिक व्यवस्थेतही सरकारला मोठे नुकसान होत आहे.

लॉकडाऊनमुळे गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले असले तरी या महामारीने आतापर्यंत कोट्यावधी लोक प्रभावित आहेत. लॉकडाऊनमुळे अनेकांना घरातच राहावे लागत आहे. परंतु याच्याउलट भारतात गुन्हेगारी आणि रस्ते अपघातांमध्ये तीव्र घट झाली आहे. यामुळे देशभरात होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत घट नोंदवली गेली आहे. यावर देशव्यापी कोणताही डेटा उपलब्ध नसला तरी काही राज्यांमध्ये पोलिस अधिकारी आणि रुग्णालयातील आपत्कालीन कर्मचार्‍यांच्या नोंदी यातून संकेत मिळत आहेत.

२५ मार्च ते १४ एप्रिल या दरम्यानच्या आकडेवारीची केरळमध्ये उच्च पोलिस अधिकारी करुणाकरण यांनी पुष्टी केली की २५ मार्च ते १४ एप्रिल दरम्यान राज्यात खून, आत्महत्या, अनैतिक मृत्यू आणि रस्ते अपघातांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. अधिकाऱ्याने मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत यावर्षी मृत्यूच्या संख्येचा आकडा सांगत म्हटले, “आम्ही यावर्षी गेल्या २५ मार्च ते १४ एप्रिल कालावधीतील हत्या प्रकरणात ४०% घट पाहिली, जी मागच्या वर्षीच्या समान कालावधीमध्ये जास्त होती.”

हिंसा प्रकरणात १०० टक्के घट
तिरुअनंतपुरम येथील राज्य गुन्हे रेकॉर्ड ब्युरोमध्ये उपअधीक्षक करुणाकरण यांनी पुढे सांगितले की बलात्काराच्या प्रकरणांमध्ये ७०% आणि महिला आणि मुलांवरील हिंसाचारात १००% घट झाली आहे. देशव्यापी लॉकडाऊन असल्याने रस्त्यावर वाहने कमी आहेत, त्यामुळे अपघातही कमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी याच कालावधीत १३ खून झाले होते, तर यावर्षी याच काळात ८ खून झाले आहेत.

आत्महत्या आणि अपघात कमी
त्याचप्रमाणे गेल्या वर्षाच्या याच कालावधीत हरवलेल्या प्रकरणांची संख्या मागील वर्षीच्या ८५१ च्या तुलनेत १३२ आहे. तर २०१९ मध्ये ४४५ आत्महत्या झाल्या होत्या, त्या कमी होऊन १९२ झाल्या आहेत. गेल्या वर्षी याच २१ दिवसांच्या कालावधीत अनैसर्गिक मृत्यूचे प्रमाण १०५२ होते, तर यावर्षी ते ६३० होते. जास्त लोकसंख्येची घनता आणि रस्त्यावर गर्दीमुळे अपघात यामध्ये मोठा वाटा असलेल्या केरळमध्येही लॉकडाऊनमुळे अपघात आणि जखमी होण्याच्या संख्या कमी झाल्या आहेत.