युद्ध झाले तर दोन्ही देशांना परवडणार नाही: इम्रान खान

इस्लामाबाद वृत्तसंस्था – पुलवामा येथील हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय हवाई दलाने आक्रमक भूमिका घेत एअर स्ट्राईक केले. भारताच्या या कामगिरीमुळे भारत आणि पाकिस्तानमधील वातावरण तणाव ग्रस्त झाले. दोन्ही देशातील तणावग्रस्त वातावरणाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा शांततेचा आव आणला आहे.

भारत आणि पाकिस्तान हे दोघेही सशस्त्र देश आहेत. युद्धामुळे कुणाचेही भले होणार नाही. त्यामुळे आपल्याला चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवावे लागतीलआम्ही चर्चेस तयार आहोतअसा दावा इम्रान खानने केला आहे.

भारताने काल केलेल्या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून आम्ही कारवाई केली आहे. मात्र युद्ध  हे कुठल्याही गोष्टीचा पर्याय ठरू शकत नाही. भारत आणि पाकिस्तान दोघेही शस्त्रसज्ज देश आहेत. त्यामुळे युद्ध झाल्यास गंभीर परिणाम होतील. त्यामुळे दोन्ही देशांना युद्ध परवडणार नाही, असंही इम्रान खान यांनी म्हटलं आहे.


दरम्यान, जे युद्ध सुरू करतात त्यांनाही या युद्धाचा शेवट काय असेल हे ठावूक नसते. आज युद्धाला तोंड फुटल्यास त्यावर माझे वा मोदींचे नियंत्रण राहणार नाही. त्यामुळे तुम्ही दहशतवादावर चर्चेला तयार असाल तर आम्हीही चर्चेला तयार आहोत, असंही इम्रान खान यांनी म्हटलं आहे.


https://twitter.com/ANI/status/1100706097323745280