2 महिन्यात जायकवाडीचे उघडले ‘5 वेळा’ दरवाजे

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – देशभर पाऊस होत असला तरी मराठवाड्यात दुष्काळाचे चटके बसत होते. शेवटी परतीच्या पावसाने हात दिल्याने आता सर्व राज्यात पावसाने सरासरी ओलांडली आहे. त्याचवेळी नाशिकमध्ये सातत्याने झालेल्या जोरदार पावसामुळे यंदा पाऊस नसतानाही जायकवाडी धरणाचे दरवाजे गेल्या २ महिन्यात उघडण्याची ५ वेळा वेळ आली आहे.  आज सकाळी यंदा ५ व्यांदा जायकवाडी धरणातून ५१ हजार क्युसेक पाणी नदीत सोडण्यात येऊ लागले आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्रात यंदा बहुतांश ठिकाणी अतिवृष्टी झाली. नाशिकमध्ये वारंवार पूर आल्याने तेथील धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडावे लागले. त्याचवेळी मराठवाडा पावसासाठी आसुसलेला होता. मात्र, नाशिक भागातून सोडण्यात आलेल्या पावसाने जायकवाडी धरण ७५ टक्के भरल्यावर प्रथम धरणातून नदीत पाणी सोडण्यात आले. त्यामुळे नदी काठच्या अडीच हजार गावांची भर पावसाळ्यात जाणवत असलेली पाणी टंचाई कमी झाली.

त्यानंतरही पाऊस सुरु राहिल्याने जायकवाडी धरण भरले गेले. त्यामुळे अतिरिक्त पाणी आणखी तीन वेळा सोडण्यात आले. त्यामुळे परभणीसह अनेक शहरातील पाणी टंचाई दूर झाली. आताही धरणात पाणीसाठी वाढल्याने आज सकाळपासून नदीत ५१ हजार क्युसेकने विसर्ग करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नदी काठच्या गावामधील रब्बी हंगामाला मोठा फायदा होणार आहे.

Visit : policenama.com