दापोडीत तरुणावर खुनी हल्ला

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

दापोडी, जयभीमनगर येथे पूर्व वैमनस्यातून  तरुणाने एकावर कोयत्याने वार करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास कुलकर्णी चाळीत घडला.

[amazon_link asins=’B0756Z43QS,B0784BZ5VY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’74d58e79-ada2-11e8-9412-a566c217989f’]

या प्रकरणी अभिषेक राजू चव्हाण (२६, रा. चव्हाणचाळ, जयभिमनगर, दापोडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तर आल्या उर्फ अॅलवीन रवी राजगोपाळ (१९,  रा. जाधव चाळ, जयभिमनगर, दापोडी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आल्या याची अभिषेक आणि त्याचा मावस भाऊ ऋतिक दिलीप संकपाळ याच्यासोबत मागील काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणांवरुन भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग मनात धरुन आल्या याने अभिषेक याच्या डोक्यात आणि डाव्या हातावर लोखंडी कोयत्याने वार केले. तसेच ऋतिक याच्याही डाव्या खांद्यावर वार केले. यामध्ये अभिषेक आणि ऋतिक दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भोसरी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. भोसरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील गाडे तपास करीत आहेत.

हुंड्यासाठी विवाहितेला जाळणाऱ्या पतीसह ६ जणांवर गुन्हा