घोडेगाव येथे बिबट्याचा ७ जणांवर प्राणघातक हल्ला

घोडेगाव : पोलीसनामा ऑनलाईन

घोडेगाव परिसरात बिबट्याने शुक्रवारी सायंकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुमारे ९ जणांवर हल्ले केले असून त्यात चौघे जण जखमी झाले आहेत. या प्रकाराने घोडेगाव शहर व परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे. मंचर भीमाशंकर रस्त्यावर घोडेगव शहराला लागून असलेल्या हॉटेल देवगिरी जवळ बिबट्याने रात्री साडेआठच्या सुमारास रस्त्याने जाणाऱ्या दुचाकी वाहनावर हल्ला केला. त्यामुळे सागर क्षीरसागर, निलांबर झाकडे, राम बिबवे, उत्तम टेकवडे हे जखमी झाले. हे चौघे दोन दुचाकीवरुन जात असताना बिबट्याने अचानक त्यांच्यावर झेप टाकून हल्ला केला. त्यात कोणाच्या पायाला तर कोणाच्या मांडीला नखाने जखमा झाल्या आहेत.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’db7829f8-c91d-11e8-ada1-092a01f2acc8′]

धोंडमाळ रोडवर अमोल काळे व राजेंद्र काळे यांच्यावही बिबट्याने हल्ला केला हे दोघेही थोडक्यात बचावले. धोंडमाळ जवळील धुलेवाडी येथे गुरुवारी बिबट्याने घोडीवर हल्ला करुन तिचा जीव घेतला. तसेच २ आॅक्टोंबरला घोडेगाव शहराला लागून असलेल्या बी डी काळे महाविद्यालयाच्या रस्त्यावर रात्री आठ वाजता दुचाकीवरुन जाणाऱ्या दोघांवर हल्ला करुन त्यांना खाली पाडले होते. पण त्याच्या आरडाओरडाने तो पळून गेल्याने दोघे थोडक्यात बचावले.

होर्डींग प्रकरण : मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना रेल्वेकडून आर्थिक मदत जाहीर

बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या लोकांना लस द्यावी लागणार असून त्यासाठी लागणारी सर्व मदत वन विभाग करणार आहे. तसेच बिबट्या पकडण्यासाठी इनामवस्तीकडे पिंजरा लावण्यात आला आहे. शनिवारी सकाळी धोंडमाळकडे देखील नवीन पिंजरा लावला जाईल. विन विभागाच्या कर्मचाऱ्यांचे रात्री गस्ती पथक नेमले असून ते बिबट्याचा वावर असलेल्या ठिकाणी हे कर्मचारी फिरुन लोकांना सावध करण्याचे काम करणार आहेत, असे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

[amazon_link asins=’B01BBNF6GM’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’fc8529a1-c91d-11e8-abf3-b9be6e64ac16′]

दरम्यान, जुन्नर तालुक्यातील बेल्हा येथील यादववाडी परिसरात भक्ष्याचे पाठलाग करताना सहा वर्ष वयाचा बिबट्या विहिरीत पडला. ग्रामस्थ, पोलीस व वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी विहिरीत पिंजरा सोडुन बिबट्या पिंजऱ्यात अलगद अडकला. वंदना पिंगट या गुरुवारी पहाटेच्या सुमारास विहिरीजवळ मोटार चालु करण्यासाठी आल्या असताना त्यांना विहिरीतुन आवाज आला. त्यांनी विहिरीत डोकावुन पाहिले असता बिबट्या मोटारीच्या पाईपाला धरुन बसलेला पाहिला. वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी येवुन खात्री केली. या ठिकाणी कुत्र्याचा पाठलाग करताना हा बिबट्या विहिरीत पडला होता. या विहिरीत एक कुत्रेही मेलेले दिसत होते. वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी माणिकडोह येथुन पिंजरा आणण्यात आला. त्यानंतर त्या पिंजऱ्याला चारी बाजुने दोर बांधुन पिंजरा पाण्यात सोडला. त्यानंतर लगेचच तो बिबट्या अलगतपणे पिंजऱ्यात अडकला. सहा ते सात तास बिबट्या पाण्यातच होता. हा बिबट्या मादी जातीचा असुन सहा वर्ष वयाचा आहे. या बिबट्याला माणिकडोह येथे हलविण्यात आले आहे.