Nashik : 4 जानेवारीपर्यंत शाळा बंद

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – नाशिकमध्ये 4 जानेवारीपर्यंत (School closed until January 4) शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी घोषणा पालकमंत्री छगन भुजबळ Guardian Minister Chhagan Bhujbal) यांनी केली आहे. नाशिक जिल्ह्यातील शाळा सुरु करण्याबाबत रविवारी (दि. 22) सर्व अधिका-यासोबत चर्चा करण्यात आली.

यावेळी पालकमंत्री भुजबळ म्हणाले की, मुंबई व पुणे जिल्ह्यात शाळा सुरु न करण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर भुजबळ यांनी आज सर्व प्रशासकीय अधिका-यासमवेत चर्चा केली. 4 जानेवारीपर्यत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. 23 नोव्हेंबरपासून 9 ते 12 चे वी पर्यंतचे वर्ग सुरु होणार होते. त्याच दरम्यान मोठ्या प्रमाणात शिक्षक कोरोनाबाधीत आढळल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे शाळा 4 जानेवारीपर्यत बंद ठेवण्यात येणार आहेत.