‘महाभारता’च्या एका सीनमध्ये ‘भीष्म’ पितामहांच्या मागे दिसाला ‘कुलर’, व्हायरल झाले मीम्स ! काय आहे सत्य ?

पोलिसनामा ऑनलाइन –डीडीवर रामायण आणि महाभारत जसं सुरू झालं आहे तशी त्याची सोशलवर खूप चर्चा होताना दिसत आहे. यावर आजपर्यंत अनेक मीम्सही यावर व्हायरल झाले आहेत. या मालिका लोक खूप लक्ष देऊन पहात आहेत. अलीकडेच समोर आलेल्या किस्स्यातून असंच काही दिसत आहे. चाहत्यांना तेव्हा त्या गोष्टीवर विश्वासच बसला नाही जेव्हा त्यांना महाभारतमधील एका सीनमध्ये कुलर दिसला.

एकानं महाभारतमधील एक सीनमध्ये कुठे तरी कुलर पाहिला. ज्यानंतर याचा स्क्रीनशॉटही सोशलवर व्हायरल होताना दिसला. अनेकांनी यावर मीम्सही बनवले. तर काहींनी यावर तऱ्हेतऱ्हेच्या कमेंट केल्या आहेत.

एकानं लिहिलं की, भीष्म पितामह एअर कुलर वापरत आहेत. एकानं कमेंट केली की, भीष्म पितामह यांनी कुलरचा वापर करणं सिद्ध करत आहे की, त्या काळातही महाभारत खूप पुढे होतं. काहींनी तर कॉमेडी कमेंटही केल्या आहेत.

एका सीनमध्ये प्रेक्षकांनी डेजर्च कुलरप्रमाणे काहीतरी पाहिलं. जे भीष्म पितामह म्हणजेच अभिनेते मुकेश खन्ना यांच्या मागे दिसत होतं. परंतु लोक ज्याला कुलर समजत आहे ती खरं तर दराबारातील एका पिलरची डिझाईन आहे.