Coronavirus : पुण्यात 24 तासात ‘कोरोना’मुळं 12 जणांचा मृत्यू तर 143 नवे पॉझिटिव्ह, आतापर्यंत 403 बळी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा कहर अद्यापही सुरूच आहे. पुण्यात 24 तासात 12 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे तर 143 नवे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. समाधानाची बाब म्हणजे आज दिवसभरात 119 जण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यात कोरोनामुळं आतापर्यंत 403 जणांचा बळी गेला आहे.

पुणे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 8205 वर पोहचली आहे. त्यापैकी तब्बल 5304 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात कोरोनाचे 2498 रूग्ण हे अ‍ॅक्टीव्ह आहेत. आज दिवसभरात पॉझिटिव्ह आढळून आलेल्या 143 रूग्णापैकी 8 ससून, 68 नायडू आणि 67 रूग्ण हे खासगी रूग्णालयातील आहेत. अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी 189 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 37 रूग्ण हे व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. पुण्यात आतापर्यंत 403 जणांचा बळी गेला आहे. उपचारानंतर बर्‍या होणार्‍यांची संख्या देखील झपाटयाने वाढत आहे.