दौंड येथील कुरकुंभमध्ये ५० ते ६० जणांच्या टोळक्याकडून ‘तुफानी’ दगडफेक

कुरकुंभ ग्रामस्थांचा रस्त्यावरच ठिय्या

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन – (अब्बास शेख) – दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथे बाहेरून आलेल्या ५० ते ६० जणांच्या टोळक्याने भर चौकात ग्रामस्थांवर तुफान दगडफेक करत मोठी दहशत माजवली आहे. या प्रकारानंतर कुरकुंभ येथील ग्रामस्थांनी आक्रमक होत रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केले आहे. यामुळे येथील परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. दौंड पोलीस घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी परिस्थिती नियंत्रणामध्ये आणली आहे.

एका इलेक्ट्रिकल ठेकेदाराचा खांबावरून पडून मृत्यू झाल्यांनातर दौंड शहरातून ५० ते ६० युवकांनी कुरकुंभ येथील चौकात येऊन तुफान दगडफेक केल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत.