Coronavirus : राज्यात 48 तासात 185 पोलिस ‘कोरोना’ पॉझिटिव्ह तर दोघांचा मृत्यू, बाधितांचा आकडा 4288 वर

ADV

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. या कोरोना बाधित रुग्णांमध्ये सर्वसामान्यांप्रमाणेच पहिल्या फळीतील योद्धे असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा देखील समावेश होतो. मागील 48 तासात राज्यात तब्बल 185 नवे कोरोना पॉझिटिव्ह पोलीस आढळून आले आहेत. तर दोन पोलिसांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. तसेच कोरोना बाधित पोलसांचा आकडा देखील वाढला असून सध्या राज्यामध्ये कोरोना बाधित पोलिसांची संख्या 4 हजार 288 वर पोहचली आहे.

ADV

राज्यात आढळून आलेल्या एकूण 4 हजार 288 कोरोना बाधित पोलिसांपैकी सध्या 998 जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर 3 हजार 239 पोलीस कर्मचारी, अधिकारी कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. डिस्चार्ज देण्यात आलेल्या काही पोलीस कर्मचाऱ्यांनी ड्युटी जॉईन केली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे 51 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

पोलीस कर्मचाऱ्यांना दिवसेंदिवस कोरोनाची लागण होत असल्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत होत असल्याने महाराष्ट्र पोलीस दलात काहींसे चिंतेचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. कोरोना लॉकडाऊनच्या काळात पोलिसांनी आपल्या जीवावर उदार होऊन, कर्तव्य बजवावे लागत आहे. नागरिकांनी घरात सुरक्षित रहावं यासाठी त्यांनी रस्त्यावर सतर्क राहावं लागत आहे. मात्र, आता त्यांना देखील कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणात होत असल्याचे पहायला मिळत आहे.