पालखी सोहळ्यात चोरट्यांचा महिलांच्या दागिन्यावर हाथ साफ

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज पालख्यांचे दर्शन करण्यासाठी गेलेल्या महिलांच्या गळ्यातील दागिन्यावर चोरट्यांनी डल्ला मरला. दोन्ही पालख्या हडपसर येथे आल्या असता दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी तीन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरुन नेले. तर एका ठिकाणी घरफोडी करुन दागिने चोरुन नेले. या घटना सकाळी नऊ ते दहा या दरम्यान घडल्या असून चोरट्यांविरुद्ध विवध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
[amazon_link asins=’B00WJI7MR0′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7d9b8fe4-8435-11e8-931b-f93f4c232930′]

शेवाळवाडी येथील ४५ वर्षीय महिला संत तुकाराम महाराज पालखीचे दर्शन घेण्यासाठी गेल्या असता, चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ६७ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे मंगळसुत्र हिसका मारुन चोरुन नेले. या महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.

दुसऱ्या घटनेत भवानी पेठेत राहणाऱ्या ३८ वर्षीय महिला भैरोबानाला चौकात ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन घेण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत ३० हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसुत्र चोरुन नेले. त्यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.

तीसरी घटना हडपसर येथील अविरत क्लासेस जवळ घडली. या घटनेत चोरट्यांनी मुढवा येथील २३ वर्षीय महिलेच्या गळ्यातील २५ हजार रुपयांचे मंगळसुत्र हिसका मारुन चोरुन नेले. या महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
[amazon_link asins=’B07BMT1VSS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’878c1e4f-8435-11e8-8099-75e659d2f652′]

दरम्यान, फुरसुंगी येथील जयकुमार बारणे (वय-४३) हे कुटुंबासमवेत घराला कुलूप लावून  संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. या संधीचा फायदा चोरट्यांनी घरात प्रवेश करुन घरातील कपाटात ठेवलेले १ लाख ५९ हजार ८५० रुपयांचे दागिने चोरुन नेले. बारणे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.