‘सोमेश्वर’च्या निवडणुकीत अनेक दिग्गजांसह 94 इच्छुकांचे अर्ज झाले बाद; 538 उमेदवार निवडणूक आखाड्यात

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील श्री. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या अर्ज छाननीत मंगळवारी (दि.२३) अनेक दिग्गजांसह ९४ उमेदवारांचे अर्ज बाद झाले. त्यामुळे ५३८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. सोमेश्वर’च्या निवडणुकीतील उमेदवारी अर्जांची मंगळवारी (दि.२३) छाननी करण्यात आली.

श्री. सोमेश्वर सह. कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत १५ फेब्रुवारीपासून ते २२ फेब्रुवारी अखेर ६३२ इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्या अर्जांची छाननी मंगळवारी ( दि.२३) झाली. या छाननीत ९४ इच्छुक उमेदवारांचे अर्ज बाद झाले. उमेदवारी अर्ज भरण्याच्या संख्येप्रमाणे अर्ज बाद होईण्याचे प्रमाणही जास्त असल्याचे बोलले जात आहे.

अर्ज बाद झालेल्या मध्ये दिग्गज उमेदवारांचा समावेश असून एक गटामधून विक्रम काकडे, राजेंद्र थोपटे, राजेश काकडे, अनिल चव्हाण, संभाजी घाडगे, यांच्यासह १४ जणांचे अर्ज बाद झाले. तर गट क्रमांक दोन मधून पोपट कोकरे, सुखदेव शिंदे यांच्यासह चार जणांचे अर्ज बाद झाले. गट क्रमांक चार मध्ये सर्वाधिक १८ जणांचे अर्ज बाद झाले. गट क्रमांक चार मध्ये ११ जणांचे अर्ज बाद झाले. गट क्रमांक पाचमध्ये १६ जणांचे अर्ज बाद झाले. भाजपचे दिलीप खैरे यांचा गट क्रमांक चार मधून अर्ज बाद झाला तर शिवसेनेचे पुरंदर तालुका प्रमुख दिलीप यादव यांचा अर्ज बाद झाला आहे.

सोमेश्वरच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस, शेतकरी कृती समिती व कारखान्याच्या इतिहासात प्रथमच भाजप आणि मित्रपक्ष आखाड्यात उतरला असून हि निवडणूक तिरंगी होण्याची चिन्हे आहेत. सोमेश्वरच्या निवडणुकीत पूर्ण ताकतीनिशी उतरणार असल्याचे उतरणार असल्याचे दिलीप खैरे यांनी सांगितले.

न्यायालयात दाद मागणार – दिलीप खैरे
सोमेश्वर कारखान्याची निवडणुक एक वर्ष पुढे ढकलली जाते त्याप्रमाणे मतदार याद्या व निकष हवे होते. मतदार याद्या व निकष जुनेच आहेत. निवडणुकीत चुकीचे निकष लावलेले असून मतदार यादीही चुकीची आहे. कारखाना व्यवस्थापन राजकीय दबावाखाली निवडणूक निर्णय अधिकारी यांना चुकीची माहिती देत आहेत. या चुकीच्या निकषां विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे भाजपचे दिलीप खैरे यांनी सांगितले.