जॉर्ज फ्लाईडच्या मृत्यूनंतर पुढं आले Hollywood स्टार्स ! फंडासाठी न्यूड फोटो अन् व्हिडीओ विकण्यास तयार झाले लोक

पोलीसनामा ऑनलाईन टीम : अमेरिकेच्या मिनियापोलसमध्ये कृष्णवर्णीय व्यक्ती जॉर्ज फ्लाईड याची पोलिसांकडून हत्या झाल्यानंतर यावरून होणारा गोंधळ दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आता सरकारी एजन्सी विरोधात सुरू असणाऱ्या या प्रोटेस्टध्ये अनेक हॉलिवूड स्टार्स सहभागी झाले आहेत. बियॉंसे, कार्डी बी आणि टेल स्विफ्ट यांनी या घटनेचा कठोर शब्दात निषेध केला आहे. याशिवाय जॉन बोयेगा, जॉन चीडो, स्टीव कौरेल, जैनेल मौने असे अनेक सेलिब्रिटी देखील या प्रोटेस्टमध्ये सहभागी झाले असून लोकांची मदत करण्यासाठी पुढे आले आहेत.

अमेरिकेतल्या मिनियापोलसमध्ये एका कृष्णवर्षीय माणसाची पोलिसांकडून हत्या झाल्याचा व्हिडीओ सोशलवर झपाट्यानं व्हायरल झाला. मृत जॉर्ज फ्लॉईड एका दुकनात मदत मागत असताना एका गोऱ्या पोलीस कर्मचाऱ्यानं त्याचा गळा दाबून त्यांना ठार केलं. या प्रकरणी मिनियापोलसच्या चार पोलीस अधिकाऱ्यांना सस्पेंड करण्यात आलं आहे. इतकंच नाही तर आरोपींना अटक करून त्यांच्यावर खटलाही चालवला जात आहे.

या घटनेनंतर पूर्ण अमेरिकेत राडा सुरू आहे. जागोजागी आंदोलनं केली जात आहे. अनेक सेलिब्रिटींनी यात मदतीचा हात दिला आणि या आंदोलनासाठी डोनेट केलं आहे. इतकंच नाही तर सेक्स वर्कर्सही या हत्येविरोधातील आंदोलनात सहभागी आहेत. फ्लॉईडच्या आंदोलनाला डोनेट करण्याच्या बदल्यात त्यांनी न्यूड फोटो आणि व्हिडीओ विकण्याचा निर्णय घेतला आहे.