17 कोटी लोकांचे PAN Card आगामी 11 दिवसात होणार ‘बेकार’, इन्कम टॅक्स विभागानं केलं ‘अलर्ट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयकर विभागाकडून लोकांना अलर्ट करण्यात आले आहे की लवकरात लवकर आपले पॅन कार्ड आधारशी लिंक करण्यात यावे. एक जरी करण्यात आलेल्या सूचनेनुसार जर तुम्ही 31 मार्चपर्यंत पॅन आधारला लिंक केले नाही तर तुमचे पॅन कार्ड रद्द होईल. याशिवाय आयकर विभाग तुमच्यावर 10,000 रुपयांचा दंड ठोठावू शकते. रद्द केलेला पॅन नंबर वापरल्या कारणाने तुमच्याकडून हा दंड आकारण्यात येईल.

आयकर विभागाची चेतावणी
पॅन कार्ड आधारला लिंक करण्याचा अलर्ट सर्व यूजर्सला देण्यात आला आहे. विभागाचे म्हणणे आहे की अनेकदा लिंक करण्यासाठी तारीख वाढवण्यात आली होती परंतु आता 31 मार्च अखेरची तारीख असेल. ज्यानंतर लिंक न केलेले पॅन कार्ड निष्क्रिय ठरतील. आयकर विभागाने ट्विट करत पॅन आधारला कसे लिंक करायचे याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे की तुम्ही कोणकोणत्या पद्धतीने पॅन आधारला लिंक करु शकतात.

तुमचे पॅन – आधार लिंक आहे का असे तपासा

सर्वात आधी www.incometaxindiaefiling.gov.in ला भेट द्यावी लागेल.

1. येथे तुम्हाला Quick links पर्याय मिळेल तेथे ‘Link Aadhaar’ वर क्लिक करावे लागेल. येथे नवी स्क्रीन ओपन होईल.
2. येथे तुम्हाला एक हायपरलिंक दिसेल. यावर क्लिक करुन तुम्ही तुमच्या पॅन-आधार लिकिंगचे स्टेटस चेक करु शकतात. हायपरलिंकवर क्लिक केल्यानंतर येथे तुम्हाला पॅन आणि आधारची माहिती भरावी लागेल.
3. तेथे माहिती भरा आणि ‘View Link Aadhaar Status’ वर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर पॅन आधार लिंकिंग स्टेटस पाहता येईल.

पॅन आधार लिंक करण्याची पद्धत –
4. पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी तुम्हाला आयकर विभागाच्या अधिकृत ई-फाइलिंग पोर्टलवर जावे लागेल.
5. येथे तुम्हाला पॅन आधार लिंक करण्याचा पर्याय मिळेल. यावर क्लिक करुन तुम्हाला तुमचा पॅन नंबर, आधार नंबर आणि तुमचे नाव टाकावे लागेल. त्यानंतर तुम्ही दिलेली माहिती आयकर विभाग तपासेल आणि त्यानंतर तुमचे लिंकिंग पूर्ण होईल.