करदात्यांना मोठा दिलासा ! FY20 च्यासाठी इन्कम टॅक्स रिटर्नची डेडलाईन वाढली, जाणून घ्या नवीन तारीख

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने आज टॅक्सपेयर्सना मोठा दिलासा दिला आहे. सरकारने आर्थिक वर्ष 2019 -20 च्यासाठी इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची डेडलाईन एक महीन्यासाठी आणखी वाढवली आहे. यानंतर आता इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची नवीन तारीख 31 डिसेंबर 2020 झाली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (CBDT) ने याबाबत माहिती दिली आहे. सीबीडीटीने आपल्याकडून जारी वक्तव्यात म्हटले आहे की, टॅक्सपेयर्ससाठी इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढवण्यात आली आहे. डेडलाईन यासाठी वाढवण्यात येत आहे, ज्यासाठी टॅक्सपेयर्सना इन्कम टॅक्स दाखल करण्यासाठी जास्त वेळ मिळावा.

यांच्यासाठी जानेवारी 2021 पर्यंत वाढली डेडलाईन
ज्या टॅक्सपेयर्सच्या अकाऊंटचे ऑडिट केले जाणार आहे, त्यांच्यासाठी इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्याची डेडलाईन दोन महिन्याने वाढवून 31 जानेवारी 2021 करण्यात आली आहे. सीबीडीटीने वक्तव्यात म्हटले, टॅक्सपेयर्ससाठी आयटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख, ज्यांच्या खात्याचे ऑडिट करणे आवश्यक आहे (ज्यांच्यासाठी आय-टी अधिनियमनुसार ठरलेली तारीख 31 ऑक्टोबर, 2020 आहे) त्यांच्यासाठी वाढवून 31 जानेवारी, 2021 करण्यात आली आहे.

अगोदर नोव्हेंबर 2020 पर्यंत वाढली होती डेडलाइन
यापूर्वी सरकारने आर्थिक वर्ष 2019-20 च्यासाठी इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2020 वरून वाढवून 30 नोव्हेंबर 2020 केली होती. कोरोना व्हायरस महामारी पहाता सरकारला हा निर्णय घ्यावा लागता होता, जेणेकरून टॅक्स पर्याप्तता वाढू शकेल आणि टॅक्सपेयर्सला सध्याच्या कोरोना संकटात दिलासा मिळू शकेल.