IND vs AUS | फाजिल आत्मविश्वासामुळे भारताचा पराभव; भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांची टीका

पोलीसनामा ऑनलाईन टीम : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर बॉर्डर – गावस्कर ट्रॉफीतील तिसरा सामना नुकताच पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने हा सामना सहज जिंकत 9 विकेट्सनी भारताचा पराभव केला. भारताच्या या लाजिरवाण्या पराभवावरून आता भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री टीम इंडियाला फटकारले आहे. (IND vs AUS)
काय म्हणाले रवी शास्त्री?
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात दणदणीत विजय मिळवला होता. भारताने पहिली कसोटी एक डाव आणि 132 धावांनी जिंकली होती, तर दुसरा कसोटी सामना 6 विकेट्सने जिंकला होता. मात्र तिसऱ्या सामन्यात त्यांची रणनीती फसली आणि या सामन्यात त्यांचा पराभव झाला. या पराभवानंतर भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी संताप व्यक्त केला आहे. ‘थोड्याशा अतिआत्मविश्वासामुळे तुम्ही खेळाला हलके घेऊ लागता. खेळलेले शॉट्स तुम्ही पुन्हा पाहा आणि अशा परिस्थितीत वर्चस्व कसे मिळवायचे हे शिका असे बोलून रवी शास्त्री यांनी टीम इंडियाला फटकारले आहे. या सामन्यात भारतीय संघ अतिआत्मविश्वासाने भरलेला होता, असा आरोपदेखील रवी शास्त्रींनी यावेळी केला. (IND vs AUS)
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात समालोचन करताना ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू मॅथ्यू हेडननेसुद्धा टीम इंडियावर निशाणा साधला आहे.
भारतीय संघातील खेळाडू प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळवण्यासाठी खेळतात.
संघ बदलण्याची गरज आहे असे मॅथ्यू हेडन म्हणाला. तसेच “केएल राहुलला संघातून वगळण्यात आले ज्यामुळे संघात अस्थिरता निर्माण झाली.
प्लेइंग 11 मध्ये खेळाडू त्यांच्या जागेसाठी खेळताना दिसतात. त्यामुळे त्यांची मानसिकता वेगळी राहते असे मॅथ्यू हेडन म्हणाला.
तसेच त्याने ट्रॅव्हिस हेड पहिल्या कसोटीचा भाग नव्हता, पण जेव्हा तो दुसऱ्या कसोटीसाठी आला तेव्हा त्याने शानदार खेळ केला
आणि ऑस्ट्रेलिया अशा गोष्टींसाठी ओळखला जातो असे म्हणत ऑस्ट्रेलियाची तारीफ केली आहे.
Web Title :- IND vs AUS | ind vs aus this is what overconfidence complacency can do ravi shastri slams rohit sharma co after losing indore test inside 3 days
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Sandeep Deshpande | संदीप देशपांडेवरील हल्लाप्रकरणी दोन जणांना अटक; भांडुपमधून केली अटक
Maharashtra Prison Department | आता विद्यार्थ्यांना संशोधनासाठी कारागृहाचे दार खुले