IND Vs AUS Test Series | बॉर्डर गावस्कर ट्रॉफीपूर्वी टीम ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! ‘हे’ 2 मॅचविनर्स खेळाडू संघाबाहेर

पोलीसनामा ऑनलाईन टीम – IND Vs AUS Test Series | भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 4 सामन्यांची सिरीज खेळवली जाणार आहे. या सीरिजला 9 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. हि ट्रॉफी बॉर्डर गावस्कर ट्रॉफी म्हणून ओळखली जाते. हि ट्रॉफी दोन्ही संघासाठी खूप महत्वाची मानली जाते. या सीरिजला सुरुवात होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या टीम मोठा धक्का बसला आहे. (IND Vs AUS Test Series)

 

2 मॅचविनर्स खेळाडू संघाबाहेर
ऑस्ट्रेलियाचा मॅच विनर गोलंदाज जोश हेझलवूड अजून पूर्णपणे त्याच्या दुखापतीतून बरा झालेला नाही. त्यामुळे तो पहिल्या टेस्ट सामन्यातून बाहेर होऊ शकतो. याशिवाय दिल्लीमध्ये होणाऱ्या टेस्ट सामन्यात देखील त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. गेल्या महिन्यात सिडनी कसोटीदरम्यान त्याच्या डाव्या पायाला दुखापत झाली होती. त्यातून तो अजूनही पूर्णपणे सावरलेला नाही. हेजलवूड संघाच्या प्री-सीरिज कॅम्पमध्ये ट्रेनिंग घेतानाही दिसला नाही. तो फक्त सहकारी खेळाडूंना मदत करताना दिसत आहे.

 

तसेच संघाचा आघाडीचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कही दुखापतग्रस्त आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान स्टार्कच्या बोटाला दुखापत झाली होती. यामुळे तो भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळू शकणार नाही आहे. त्यांच्या जागी स्कॉट बोलँडचा संघात स्थान देण्यात आले आहे. पॅट कमिन्ससोबत संघातील दुसरा वेगवान गोलंदाज ठरू शकतो.

ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिल्या 2 टेस्टसाठी भारताची टीम
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मो. शमी, मो. सिराज, उमेश यादव, जयदेव उनादकट, सूर्यकुमार यादव.

 

भारताविरूद्ध ऑस्ट्रेलियाची टीम
पॅट कमिंस (कर्णधार), एश्टन एगर, स्कॉट बोलँड, एलेक्स केरी, कॅमरून ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, ट्रेविस हेड,
उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नाथन लियोन, लांस मॉरिस, टोड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव स्मिथ (उपकर्णधार),
मिशेल स्वेपसन, डेविड वॉर्नर

 

भारत – ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेळापत्रक
पहिली टेस्ट- 9 ते 13 फेब्रुवारी, नागपुर
दूसरी टेस्ट- 17 ते 21 फेब्रुवारी, दिल्ली
तिसरी टेस्ट- 1 ते 5 मार्च, धर्मशाला
चौथी टेस्ट- 9 ते 13 मार्च, अहमदाबाद

 

Web Title :- IND Vs AUS Test Series | ind vs aus test series after mitcheel starc josh hazlewood will be out of first test match in nagpur

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Eknath Khadse | ‘…त्यावेळी भाजपला बिनविरोधची आठवण झाली नाही;’ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची भाजपवर टीका

Prakash Ambedkar | कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीवर प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले…

Pune Crime News | चोर्‍या करणार्‍या तडीपार गुन्हेगाराकडून 3 गुन्हयांची उकल; समर्थ पोलिसांची कामगिरी