IND vs NZ | 17 नोव्हेंबर, 17 नंबरची जर्सी, 17 चेंडूवर 17 धावा, 2017 मध्ये पदार्पण; तुम्हाला माहित आहे का Love 17 असलेल्या खेळाडूचे नाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – IND vs NZ | भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) च्या जबरदस्त खेळीच्या बळावर टी 20 सामन्यात न्यूझीलंडला 5 गडी राखून पराभूत करण्यात आले. जिंकण्यासाठीचे 165 धावांचे लक्ष्य भारताने दोन चेंडू बाकी असताना 5 गडी गमावून प्राप्त केले. भारताच्या विजयाचा सूत्रधार सूर्यकुमार आणि रोहित होते, ज्यांनी अनुक्रमे 62 आणि 48 धावांची खेळी (IND vs NZ) केली.

 

के. एल. राहुल 15 धावा करून बाद झाला तर टी20 वर्ल्ड कपमधून बाहेर राहिल्यानंतर संघात पुनरागमन करणारा श्रेयस अय्यर स्थिर वाटत नव्हता आणि 5 धावा बनवून त्याने आपली विकेट गमावली. पदार्पणाच्या सामन्यात वेंकटेश अय्यरने येताच डेरिल मिचेलला चौकार लगावला परंतु पुढील चेंडूवर रिव्हर्स स्वीप खेळण्याच्या प्रयत्नात रविंद्र रचिन झेल देऊन बसला. यानंतर ऋषभ पंत (Rishabh Pant) याने विजयी चौकार ठोकून भारताला विजय (IND vs NZ) मिळवून दिला.

 

17 क्रमांकाचा योगायोग

24 वर्षीय पंत (Rishabh Pant) भारतासाठी सातत्याने फिनिशर भूमिका पार पाडत आहे. 2017 मध्ये भारतासाठी डेब्यू करणारा पंत आता क्रिकेटच्या तिनही प्रकारामध्ये संघाचा महत्वाचा खेळाडू बनला आहे. न्यूझीलंडविरुद्ध (India vs New Zealand) पहिल्या टी20 सामन्यात पंतचे 17 क्रमांशी खास नाते जोडले गेले. स्फोटक फलंदाज पंत 17 क्रमांकाची जर्सी घालतो. बुधवारी (17 नोव्हेंबर) पंत (Rishabh Pant) कीवी संघाविरूद्ध 17 चेंडूत 17 धावा बनवून नाबाद राहिला.

 

पंतने भारताकडून 25 कसोटी, 18 एक दिवसीय आणि 39 टी20 सामने खेळले आहेत.
कसोटी सामन्यांमध्ये त्याच्या नावावर 1549, एक दिवसीयमध्ये 529 आणि टी20 मध्ये 607 धावा नोंदल्या गेल्या आहेत.
या खेळाडूत कसोटी क्रिकेटमध्ये तीन शतके आणि 7 अर्धशतके ठोकली आहे.
तर एकदिवसीयमध्ये तीन आणि टी20 मध्ये दोन वेळा अर्धशतकापेक्षा जास्त धावसंख्या करण्यात तो यशस्वी ठरला आहे. (IND vs NZ)

 

Web Title :- IND vs NZ | ind vs nz t20i rishabh pant special love for number 17 against new zealand know unique connection

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Belly and Waist Fat | महिनाभरात एकाचवेळी कमी होईल पोट आणि कंबरेची चरबी, केवळ ‘हे’ 3 व्यायाम नियमित करा; जाणून घ्या

Japanese long lives | गोड पदार्थ आणि चपाती वर्ज्य, जाणून घ्या जपानी लोकांच्या दिर्घायुष्याची ‘ही’ 10 रहस्य

Pune Crime | ‘तू कोण अधिकारी आहे का?, माझ्या नादी लागलास तर जीवानिशी मारुन टाकीन’ ! पुणे मनपाच्या नगरसेवकाच्या कार्यकर्त्याला ठेकेदाराची मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी